खामगाव तालुक्यातील राहुड येथील नवरा आणि नांदुरा तालुक्यातील जिगाव येथील नवरी यांचा लग्नसोहळा संपन्न झाला. त्यांच्या लग्नाचं आकर्षण ठरलं ते त्यांची वरात. एरवी बँड-बाजासह वरात घेऊन नवरदेव नवरीला घ्यायला तिच्या दारात येतो. इथं मात्र टाळ-मृदुंगाच्या गजरात नवरदेव नवरीला घ्यायला आला.
लग्नाच्या या वरातीत शेकडो वारकरी सहभागी झाले होते. वरातीत वारकऱ्यांसह नवरदेवानंही टाळ-मृदुंगाच्या तालावर ताल धरल्याचं दिसलं आहे.
अर्रर्रर्र! वरातीत घोड्यावर चढताना फाटली नवरदेवाची पँट; पुढे काय झालं VIDEO मध्येच पाहा
टाळ - मृदुंगाच्या गजरात नवरदेवाने आपली मिरवणूक काढत लग्न उरकले आणि त्यावर विनाकारण होणारा हजारो रुपयांचा खर्च टाळला. या दाम्पत्याने ज्या पद्धतीने हजारो रुपयांची उधळपट्टी रोखली ते कौतुकास्पद आहे.
हेडफोन घालून सायलेंट वरात
याआधी सायलेंट वरातीचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. लग्नाच्या वरातीत डीजे होता. पण तो मोठमोठ्याने वाजवला जात नव्हता. तर प्रत्येक वऱ्हाड्याला हेडफोन देण्यात आले होते. हेडफोन घालून ते लग्नाच्या वरातीत नाचत आहेत.
@shefooodie इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. तुम्ही अशी कोणती लग्नाची अनोखी वरात पाहिली होती का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
