अर्रर्रर्र! वरातीत घोड्यावर चढताना फाटली नवरदेवाची पँट; पुढे काय झालं VIDEO मध्येच पाहा
- Published by:Priya Lad
Last Updated:
नवरदेवाची वरातीत चांगलीच फजिती झाली. वरातीतच नवरदेवाची पँट फाटली. लग्नाच्या वरातीचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
मुंबई : लग्नात सर्वांना उत्सुकता असते ती वरातीची. नवरीबाईला आणण्यासाठी आणि तिला घेऊन येताना बँडबाजासह वाजतगाजत वरात काढली जाते. यावेळी घोड्यावर बसलेल्या नवरदेवाचा एक वेगळाच थाट असतो. घोड्यावर तोऱ्यात बसायला गेलेल्या अशाच एका नवरदेवाची वरातीत चांगलीच फजिती झाली. वरातीतच नवरदेवाची पँट फाटली. लग्नाच्या वरातीचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
इतके दिवस लग्नाची इतकी तयारी करूनही नवरदेवासोबत नको तेच घडलं. वरातीतच घोडं अडलं आणि याचं कारण म्हणजे नवरदेवाची पँट. घोड्यावर चढण्याआधीच या नवरदेवाची पँट फाटली. अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता वरात निघण्याच्याच तयारीत असते. नवरा घोड्यावर चढायला जातो आणि त्याच्यासोबत मोठी घटना घडते. नवरदेवाची पँट फाटते.
advertisement
लग्नाचे कपडे ऐनवेळी फाटणं यापेक्षा मोठी समस्या नवरदेवासाठी दुसरी कोणती असेल. कारण लग्नासाठी खास ड्रेस तर बनवून घेतला जातो. त्यामुळे कपडे फाटल्याने हा नवरदेवही संतप्त झाला आहे.
फजितीनंतर नवऱ्याचा पारा चढला आणि वऱ्हाड्यांवरच त्याने आपला राग व्यक्त केला. नवदेवाचा हा आवेश पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही. रागावून तो वऱ्हाड्यांना म्हणाला देखील, ‘माझी पँट फाटली आहे…’ आणि त्यानंतर तो दुसरी पँट आणण्याचे आदेशही वऱ्हाड्यांना देतो.
advertisement
या व्हिडीओ वरातीमधीलच कुणीतरी रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल होतो आहे.
advertisement
@rizzytalk इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
view commentsLocation :
Delhi
First Published :
March 25, 2024 12:51 PM IST
मराठी बातम्या/Viral/
अर्रर्रर्र! वरातीत घोड्यावर चढताना फाटली नवरदेवाची पँट; पुढे काय झालं VIDEO मध्येच पाहा


