TRENDING:

Ganesh Chaturthi 2025: बाप्पा भक्तांच्या मदतीला धावली रेल्वे, कोकण ते नागपूर 300 स्पेशल गाड्यांची सोय

Last Updated:

Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने अनेकदा प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण मानला जातो. या काळात मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरांमधून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गणेशोत्सवात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे दरवर्षी जादा गाड्या सोडते. यावर्षी देखील मध्य रेल्वे सणासुदीच्या काळात 306 गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या आठवरून 16 करण्यात आली आहे.
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा भक्तांच्या मदतीला धावली रेल्वे, कोकण ते नागपूर 300 स्पेशल गाड्यांची सोय
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा भक्तांच्या मदतीला धावली रेल्वे, कोकण ते नागपूर 300 स्पेशल गाड्यांची सोय
advertisement

गौरीगणपतीच्या सणामुळे, मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे. मध्य रेल्वेने 22229/22230 क्रमांकाच्या मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस 25, 27 आणि 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील सीएसएमटीहून तर 26, 28 आणि 30 ऑगस्ट रोजी मडगावहून धावेल. ही सुविधा केवळ गणेशोत्सवाच्या विशेष गर्दीच्या कालावधीसाठी असणार आहे, असं मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं.

advertisement

Ganeshotsav 2025: चाकरमान्यांसाठी एसटीचा मोठा निर्णय, गणपतीसाठी सोडणार अतिरिक्त बस, असं आहे नियोजन

मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते स्वप्नील निला म्हणाले, "महाराष्ट्र आणि कोकण विभागातील रेल्वे गाड्यांमध्ये गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे मडगाव, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, खेड, चिपळूण, पुणे, नागपूर इत्यादी विविध ठिकाणी 306 विशेष गाड्या चालवणार आहे."

advertisement

याशिवाय, कोकणात जाणाऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे देखील या आठवड्यापासून अतिरिक्त गाड्या चालवणार आहे. रविवारी (24 ऑगस्ट) 20 टक्के जादा गाड्या असल्याने कोकणाकडे जाणाऱ्या एकाच मार्गावर गाड्या अडकल्या होत्या. त्यामुळे कोकण रेल्वे सुमारे 2 तास उशिराने धावत होती.

लोकमान्य टिळक टर्मिनस-सावंतवाडी विशेष गाडी

लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी)-सावंतवाडी गणेशोत्सव विशेष गाडी 28 आणि 31 ऑगस्ट आणि 4 आणि 7 सप्टेंबर रोजी दोन्ही मार्गांवर धावेल. ट्रेन क्रमांक 01131 सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी एलटीटीहून निघेल आणि रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. परतीची ट्रेन क्रमांक 01132 सावंतवाडीहून रात्री 11 वाजून 20 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी एलटीटीला पोहोचेल. या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, रत्नागिरी, कणकवली आणि सिंधुदुर्ग यांसारख्या प्रमुख स्टेशन्सवर थांबतील.

advertisement

नागपूरसाठी विशेष गाडी

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरसाठी देखील गणेशोत्सव विशेष गाडी सोडली जाणार आहे. 01101 क्रमांकाची गाडी मुंबईतील सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी अशी धावेल. या गाडीची तिकीट बुकिंग सुरू झालं असून रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा भक्तांच्या मदतीला धावली रेल्वे, कोकण ते नागपूर 300 स्पेशल गाड्यांची सोय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल