मेट्रो 3ची सध्या आरे ते आचार्य अत्रे चौकापर्यंत सेवा सुरू आहे. सोमवार ते शनिवार ही मेट्रो सकाळी 6 वाजून 30 मिनिटांपासून ते रात्री 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत धावते. मात्र, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी ही सेवा उशीरा सुरू होते. त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही मेट्रोची सेवा लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरसीएलने ट्विट करून याबाबत माहिती दिली.
advertisement
गणेशोत्सव काळात मध्यरात्रीपर्यंत धावणार
गणेशोत्सवादरम्यान मेट्रो 3ची वेळ मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. गणेशोत्सवात मेट्रो सकाळी 6 वाजून 30 मिनिटांपासून ते मध्यरात्री 12 पर्यंत धावेल. सध्या आरे ते आचार्य अत्रे चौकादरम्यान मेट्रो सुरू आहे. दररोज सुमारे 60 हजार प्रवासी मेट्रो-3 कॉरिडॉरचा वापर करत आहेत.
