Mumbai Metro: आता बिनदास्त बघा गणपती! वरळी ते आरे मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार, कसं असेल वेळापत्रक?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Mumbai Metro: आरे ते वरळी प्रवास सुमारे 30 मिनिटांत पूर्ण करता येतो. प्रवासाचा वेळ वाचत असल्याने हजारो प्रवासी या मेट्रो लाईनचा वापर करतात.
मुंबई: 27 ऑगस्ट (बुधवार) पासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. मुंबईमध्ये हा उत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला जातो. याकाळात लाखो मुंबईकर गणपती बघण्यासाठी घराबाहेर पडतात आणि रात्री उशीरापर्यंत प्रवास करतात. ही बाब लक्षात घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवादरम्यान मेट्रो 3 ची सेवा वाढवण्याचा निर्णय एमएमआरसीएलने घेतला आहे. गणेशोत्सवादरम्यान 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मेट्रोचे कामकाज सुरू राहील.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सध्या आरे ते वरळी मेट्रो सकाळी 6 वाजून 30 मिनिटांपासून ते रात्री 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत धावते. मात्र, गणेशोत्सवादरम्यान ही वेळ मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आली आहे. गणेशोत्सवात मेट्रो सकाळी 6 वाजून 30 मिनिटांपासून ते मध्यरात्री 12 पर्यंत धावेल. सध्या आरे ते आचार्य अत्रे चौकादरम्यान मेट्रो सुरू आहे. दररोज सुमारे 60 हजार प्रवासी मेट्रो-3 कॉरिडॉरचा वापर करत आहेत.
advertisement
वरळी आणि आरे यांमधील मेट्रो 'मुंबई मेट्रो लाइन 3'चा भाग आहे. आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ऑक्टोबर 2024 मध्ये झालं आणि बीकेसी ते आचार्य अत्रे चौक या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन मे 2025 मध्ये झालं. या प्रकल्पामुळे आरे ते वरळी प्रवास सुमारे 30 मिनिटांत पूर्ण करता येतो. प्रवासाचा वेळ वाचत असल्याने हजारो प्रवासी या मेट्रो लाईनचा वापर करतात. गणेशोत्सवाच्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 11:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Metro: आता बिनदास्त बघा गणपती! वरळी ते आरे मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार, कसं असेल वेळापत्रक?


