छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर हे झपाट्याने वाढत आहे. या शहराला मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखली जाते. या शहरामध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उद्योग आहेत. वाढत्या उद्योगांमुळे येणाऱ्या लोकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात लोकसंख्या वाढल्यामुळे घरांनाही मोठ्या प्रमाणात मागणी आली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील कुठल्या भागात घरांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे, तसेच त्यामागची नेमकी कारणे काय आहेत, याविषयी इस्टेट एजंट संदीप कुलकर्णी यांनी सविस्तर माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर शहर हे झपाट्याने वाढत आहे. उद्योग जास्त असल्याने लोकसंख्याही जास्त आहे. यामुळे घरांनाही प्रमाणात मागणी आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी, टिळक नगर, उस्मानपुरा, वेदांत नगर, श्रेयनगर, बन्सीलाल नगर आणि रेल्वे स्टेशन एरिया या भागांतील घरांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याने या ठिकाणी असलेल्या घरांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.
Ganeshotsav Pune : गणपतीसाठी सुंदर देखावे सेट घ्यायचेय तर पुण्यातील हे ठिकाण तुमच्या कामाचं, VIDEO
हे सर्व परिसर हॉस्पिटल सुविधा, शैक्षणिक सुविधा, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, बाजारपेठेपासून जवळ आहेत. यामुळेच या ठिकाणी असलेल्या घरांचे दर जास्त आहेत. या ठिकाणी एका स्क्वेअर फुटची किंमत 8 ते 10 हजार आहे. या ठिकाणी घरांच्या किमती खूप आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी टू बीएचके फ्लॅट घ्यायचा असेल तर तो 50 ते 60 लाख या किमतीमध्ये मिळेल. तसेच जर तुम्हाला थ्री बीएचके फ्लॅट घ्यायचा असेल तर तो 70 लाखांच्या पुढे आहे. अशा किमती या भागांमध्ये आहेत.
महालक्ष्मी, गणेशोत्सवात मखर खरेदी करायचंय?, छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाहून एक बेस्ट पर्याय, VIDEO
या ठिकाणी किमती जरी वाढत चालल्या असल्या तरीही लोकांची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरातून सर्व महत्त्वाची ठिकाणे जवळ असल्याने याच भागांमध्ये घर घ्यायला लोकांची पहिली पसंती आहे, असे इस्टेट एजंट संदीप कुलकर्णी यांनी सांगितले.