TRENDING:

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, छ. संभाजीनगरहून दिल्लीसाठी दिवसाला 3 विमानसेवा, पाहा वेळापत्रक

Last Updated:

दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून दिल्लीसाठी दररोज तीन वेगवेगळ्या वेळात उड्डाणे होतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून दिल्लीसाठी दररोज तीन वेगवेगळ्या वेळात उड्डाणे होतील. आतापर्यंत सकाळी आणि संध्याकाळी अशी दोनच उड्डाणे सुरू होती. मात्र, एअर इंडियाने नव्या हिवाळी वेळापत्रकात दुपारच्या सत्रात एक अतिरिक्त सेवा सुरू केली आहे.
आता संभाजीनगरहून दिल्लीसाठी दिवसभरात तीन विमान<br>‎
आता संभाजीनगरहून दिल्लीसाठी दिवसभरात तीन विमान<br>‎
advertisement

‎26 ऑक्टोबरपासून लागू झालेल्या या हिवाळी वेळापत्रकानुसार 28 मार्च 2026 पर्यंत ही सुविधा कायम राहणार आहे. नव्या सेवेमुळे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळात दिल्लीसाठी विमान मिळणार असल्याने प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा झाला आहे.

Bhide Bridge Update : पुण्यातील भिडे पूले दिवसा खुला ठेवण्याची मागणी; पालिका काय निर्णय घेणार?

advertisement

रविवारी सुरू झालेल्या या नव्या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी दुपारच्या विमानातून तब्बल 156 प्रवाशांनी दिल्लीचा प्रवास केला. या अतिरिक्त उड्डाणामुळे प्रवासासाठीच्या प्रतीक्षेतही मोठी घट होणार आहे.

‎‎विमानतळ प्राधिकरणाकडून आगामी काळात इतर शहरासाठी देखील विमानसेवा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

‎‎दिल्ली उड्डाणांचे वेळापत्रक

‎एअर इंडिया (सकाळचे उड्डाण) दिल्लीहून सकाळी 6 वाजता टेकऑफ आणि संभाजीनगरात सकाळी 8 वाजता लँडिंग.

advertisement

शहरातून सकाळी 8:40 वाजता टेकऑफ दिल्लीत सकाळी 10:35 वाजता लँडिंग असेल.

‎‎एअर इंडिया (दुपारचे उड्डाण)

‎दिल्लीहून दुपारी 2 वाजता टेकऑफ आणि संभाजीनगरात दुपारी 3:40 वाजता लँडिंग.

‎‎शहरातून सायं. 4:30 वाजता टेकऑफ आणि दिल्लीत सायं. 6:20 वाजता लँडिंग असेल.

‎‎इंडिगो (संध्याकाळचे उड्डाण)

‎दिल्लीहून सायं. 4:55 वाजता टेकऑफ असेल आणि संभाजीनगरात सायं. 6:35 वाजता लँडिंग असेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

शहरातून सायं. 7:15 वाजता टेकऑफ आणि दिल्लीत रात्री 9:05 वाजता लँडिंग.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, छ. संभाजीनगरहून दिल्लीसाठी दिवसाला 3 विमानसेवा, पाहा वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल