छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांचे पाय कुंकवाच्या पाण्यात बुडवून त्यांचे ठसे कागदावर उमटवण्यात आले आहे. हे केवळ स्वागत नाही तर ज्ञानाच्या मंदिरात पाऊल ठेवताना एक पारंपारिक आणि शुभ सुरुवात देण्याचा प्रयत्न होता. मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या नेतृत्वाखाली शाळा केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापूर्ती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना शाळेत रमवण्यासाठी सतत प्रयत्नशील असते, शाळा सरकारी आहे मात्र या ठिकाणी कम्प्युटर लॅब, डिजिटल बोर्ड, स्पोर्ट्स ग्राउंड अशा विविध पद्धतीचे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. यामुळेच महानगरपालिकेच्या शाळेचे स्थान पालकांमध्ये विश्वास निर्माण करत आहे.
advertisement
शाळेची प्रवेश क्षमता पूर्ण झाली असून पहिली वर्गासाठी 40 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अंगणवाडीला देखील 40 विद्यार्थी आहे, तसेच सीबीएससीच्या प्रवेशासाठी 300 मुलांच्या अर्ज आमच्याकडे येतात आणि त्यातून 40 जणांची निवड केली जाते. शाळेच्या सोयीसुविधा तसेच शिक्षण पद्धती पालकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे म्हणून आम्ही सतत पालकांच्या भेटी घडून आणतो त्यांच्याशी संवाद साधतो. तसेच पालकांनी देखील आपल्या पाल्याची प्रगती प्रत्येक महिन्याला जाणून घेतली पाहिजे, असे देखील सोनार यांनी सांगितले आहे.