TRENDING:

Agriculture: मराठवाड्यात पावसाचा कहर, डाळिंबाची बाग उद्ध्वस्त, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी!

Last Updated:

Agriculture: मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. यात शेतीचं मोठं नुकसान झालं असून डाळिंबाच्या बागा आडव्या झाल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली असून काही ठिकाणी फळबागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या पळशी गावातील अर्जुन पळसकर यांच्या डाळिंब शेतीचं मोठं नुकसान झालंय. शेतातील 400 झाडांपैकी जवळपास 75 टक्के डाळिंबाच्या झाडांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेताचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी पळसकर यांनी लोकल18 सोबत बोलताना केलीये.
advertisement

राज्यभरासह मराठवाड्यात देखील गेल्या 48 तासात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पळशी गावातल्या शेतकऱ्यांचे तूर, मका यांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी अर्जुन पळसकर यांची डाळिंबाची फळबाग जमिनीवर पूर्णपणे आडवी झाली आहे. त्यामुळे वर्षांची मेहनत वाया गेली आहे. शेतकरी हवालदिल झाले असून लाखोंच खर्च करूनही हातात काहीच लागणार नसल्याने चिंतेत आहे.

advertisement

Farmer Success Story: 3 वर्षांपासून लागवड, टोमॅटो शेतीने पालटलं शेतकऱ्याचं नशीब, आता कमाई लाखात!

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी पडतेय? शरिराला लावा तिळाचे कोमट तेल, होतील हे फायदे
सर्व पहा

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो सर्वांना अन्नधान्य पुरवतो. मात्र आज शेतकऱ्याची जगण्याची अवस्था बिकट झालेली आहे. फळबागांसाठी खत औषधाचा तुटवडा भासवतो, डाळिंबासाठी काही मोजक्या झाडांना फवारणी करायचं म्हटलं तर 500 रुपये खर्च येतो. शेतकरी घरातल्या लेकरांचा घास काढून या झाडांना लावतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याला हातपाय टेकावे लागतात. अशावेळी शासनाने तात्काळ पंचनामे करून मदतीचा हात द्यावा, असे शेतकरी बाबासाहेब गायकवाड म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Agriculture: मराठवाड्यात पावसाचा कहर, डाळिंबाची बाग उद्ध्वस्त, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल