रिक्षाचालक अनिता कटकुरे लोकल 18 सोबत बोलताना सांगतात की, रिक्षा घेण्याअगोदर पोलीस प्रशासनातील अधिकारी यांच्या घरी धुणी-भांडी करण्याचे मी काम करत होते. खाकी वर्दी अंगावर घालण्याची खूप इच्छा असल्यामुळे अधिकारी तरडे म्हणाले की, तुम्ही चौथी पास करा, पोलीसमध्ये लावून देतो.
Weather Alert : महाराष्ट्रातून आता पावसाची एक्झिट, पण येणार नवं संकट, हवामान खात्याकडून अपडेट!
advertisement
त्यानंतर चौथी पास केली आणि पोलीस होण्यासाठी सातवी पासचा नियम आला. त्यामुळे पोलीस होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले, त्यानंतर रिक्षाचालकाचे काम शिकले, परवाना काढण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले आणि तेव्हापासून संसाराचा गाडा चालवण्यासाठी तीन चाके चालवणे सुरू केले.
रिक्षा चालवून कमाई जास्त नाही पण उदरनिर्वाह होतो, दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतः रिक्षा चालवणे किंवा व्यवसाय करणे कधीही चांगले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील कोणत्याही ठिकाणचे किराया आला तर जावे लागते, जालना, परभणी, बीड तसेच रुग्णांना दवाखान्यात ने-आण करणे, अशी कामे करत असल्याचे देखील कटकुरे यांनी सांगितले आहे.