TRENDING:

Nath Shashti 2026: नाथषष्ठीला पैठणला जाताय? 3 दिवस वाहतूक मार्गात बदल, पाहा पर्यायी मार्ग

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: नाथषष्ठीला भाविकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पैठणकडे येणाऱ्या-जाणाऱ्या जड वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेसाठी पैठण नगरीत 9 ते 11 मार्चदरम्यान लाखो भाविकांची गर्दी उसळणार आहे. राज्यभरातून अंदाजे 12 ते 15 लाख भाविक विविध वाहनांनी वा पायी यात्रा उत्सवाकरिता येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पैठणकडे येणाऱ्या-जाणाऱ्या जड वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी आदेश जारी केले आहेत.
Nath Shashti 2026: नाथषष्ठीआधी मोठा निर्णय, पैठणच्या वाहतूक मार्गात बदल, इथं पाहा पर्यायी मार्ग
Nath Shashti 2026: नाथषष्ठीआधी मोठा निर्णय, पैठणच्या वाहतूक मार्गात बदल, इथं पाहा पर्यायी मार्ग
advertisement

Vande Bharat: वेग वाढला, आता वेळ वाचणार, लगेच पाहा नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं बदललेलं वेळापत्रक

पैठणकडे जाणाऱ्या मार्गातील वाहतूक बदल

शहागड आपेगाव- पैठणकडून छत्रपती संभाजीनगरमार्गे जाणारी वाहने शहागड - पाचोड -मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील.

View More

सोलापूर धुळे एनएच 52 महामार्ग कचनेर फाटा, पोरगाव चौफुली, बिडकीन शेकटा इसारवाडी फाटा- छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे मार्गे अहिल्यानगरकडे जाणारी वाहने ही सोलापूर धुळे एनएच-52 महामार्ग बीड मार्गे येणारी जड वाहतूक ही एनएच-52 महामार्ग ते सरळ पुढे ए-एस क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर हायवेने अहिल्यानगरकडे जातील. तसेच याचप्रमाणे उलट दिशेने वाहने ये-जा करतील.

advertisement

जालनाकडून करमाड-कचनेर फाटा-पोरगाव-बिडकीन-शेकटा इसारवाडी फाटा-छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे मार्गे अहिल्यानगरकडे जाणारी वाहने ही करमाड-कचनेर फाटा सोलापूर धुळे एनएच-52 महामार्ग ते सरळ पुढे ए-एस क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवेने अहिल्यानगरकडे जाईल. याप्रमाणेच उलट दिशेने वाहने ये-जा करतील.

छत्रपती संभाजीनगर- बिडकीन पैठण मार्गे शेवगावकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर वाळूज-गंगापूर-वाळूज मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.

advertisement

शेवगाव-पैठण-बिडकिन मार्गे छ. संभाजीनगराकडे येणारी वाहने शेवगाव -नेवासा गंगापूर-वाळूज मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जातील.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचं मार्केट हाललं, लिंबू अन् शेवग्यालाही भाव, कुठं मिळाला सर्वाधिक दर?
सर्व पहा

इसारवाडी फाटा-शेकटा-बिडकिन-पैठणकडे येणारी जड वाहने इसारवाडी फाटा ए.एस. क्लब छत्रपती संभाजीनगर बीड बायपास मार्गे पाचोडकडे जातील.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Nath Shashti 2026: नाथषष्ठीला पैठणला जाताय? 3 दिवस वाहतूक मार्गात बदल, पाहा पर्यायी मार्ग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल