आत्महत्येपूर्वी आयशाने एक सुसाइड नोट लिहिली होती. “अगर किसी को दिल में रखना है तो दिल से रखो, दिल रखने के लिए दिल में मत रखो…” अशा आशयाच्या ओळी तिने लिहिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने फसवणूक करत दुसरे लग्न केले होते तसेच सात लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.
advertisement
'आई-बाबा परगावी राहण्याची भीती वाटते..'; नोकरी मिळाली, सत्कार झाला पण दुसऱ्याच क्षणी सगळं संपलं
या प्रकरणी मृत महिलेच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून हर्सल पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती अरबाज सलीम शेख, सासू सायरा सलीम शेख आणि अलीम सलीम शेख (सर्व रा. भिवंडी, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आयशाचा विवाह 2022 मध्ये अरबाज शेख याच्याशी झाला होता. विवाहानंतर पतीने व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत छळ सुरू केल्याचा आरोप आहे. आयशा दुसऱ्यांदा गर्भवती असल्याने 13 नोव्हेंबर रोजी पतीने तिला माहेरी सोडून दिले होते.
नव्या पाहुण्यांच्या आगमनाची चाहूल लागलेली असतानाच, 25 डिसेंबर रोजी आयशाने आपल्या लहान मुलाला बाजूला झोपवून बेडरूममध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आयशाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी
‘मैं कहां आ के फंस गई, कहां से मैंने शादी की और क्यों की? अच्छी लाइफ थी, और अब देखो मुझे उनमें कोई दिलचस्पी नहीं है, क्योंकि वह मुझसे प्यार नहीं करते. अब सिर्फ मेरे बच्चे के लिए रह रही हूं. मैं ऐसा नहीं है कि मैंने प्यार नहीं किया. बहुत प्यार किया मैंने. लेकिन अंजाम ज्यादा बुरा मिला. किसी को बोल भी नहीं सकती हूं. क्या बोलना, अब भरोसा भी नहीं है. हर बार बस सोनी.. सोनी.. सोनी मेरा मूड खराब हो जाता है. सोनी का नाम सुनकर. जाने दो क्या बोलना. मनहूस है. तू है या तो मैं हूं करना मैं परेशान हो गई हूं बहुत. अरबाज के घरवाले बहुत परेशान करते हैं. और यह भी मैं भी इंसान हूं. मेरी भी लाइफ है, मेरी भी ख्वाहिशें हैं. लेकिन तू नहीं है. अब जो है बच्चे हैं मुझे उनको देखना है. उनको नहीं फिक्र. लेकिन मुझे तो है ना. कभी मैंने चोट दी तो मेरी बेबी की जान जाएगी. आय हेट माय लाइफ. मेरे दिल में नहीं अब कोई भी और होगा मुझे. अगर किसी को दिल में रखना है तो दिल से रखो, दिल रखने के लिए दिल में मत रखो....’






