छत्रपती संभाजीनगर शहरातील ऑरिकसिटी अंतर्गत बिडकीन डीएमआयसी, शेंद्रा एमआयडीसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांचा कल वाढला आहे. बिडकीन डीएमआयसीमध्ये 8 हजार एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. उद्योजकांसाठी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या औद्योगिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे एथर एनर्जी, टोयोटा, किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू, ग्रीन मोबिलिटी यासह लुब्रीझोल या कंपन्यांनी गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
advertisement
नोकरी सोडली, तरुण करतोय आता गावरान अंड्यांची विक्री, महिन्याला होते इतकी कमाई, Video
नुकत्याच सहा कंपन्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील डीएमआयसीमध्ये 1261 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यातून 3300 रोजगार उपलब्ध होणार आहेत.
या कंपन्यांनी केली गुंतवणूक
मेटलमन ग्रुप - 7 एकर जमीन-187 कोटी गुंतवणूक, 588 लोकांना रोजगार.
राखो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड - 7 एकर -93 कोटी गुंतवणूक, 550 लोकांना रोजगार.
महिंद्रा असो प्रायव्हेट लिमिटेड - 10 एकर जागा -140 कोटींची गुंतवणूक, 500 लोकांना रोजगार.
जुन्ना सोलार प्रायव्हेट लिमिटेड - 10 एकर जागा, 400 कोटींचा गुंतवणूक, 1050 लोकांना रोजगार.
टोयोटा गोसावी प्रायव्हेट लिमिटेड - 10 एकर जागा, 140 कोटींची गुंतवणूक, 500 लोकांना रोजगार.
एन.एक्स. लॉजिस्टिक -13 एकर जागा, 83 कोटींची गुंतवणूक, 400 लोकांना रोजगार.