शनिवारी, 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरमधील टीव्ही सेंटर, बजरंग चौक, कॅनॉट प्लेस, गुलमंडी अशा विविध भागात दहीहंडी उत्सव होणार आहे. या काळात दहीहंडीसाठी हे चौक वाहतुकीसाठी बंद राहतील.
वाहतूक बंद असणारे चौक
1) टीव्ही सेंटर चौक व परिसर : साक्षी मंगल कार्यालय, हडको कॉर्नर, जिजाऊ चौक आणि - आयपी मेस ते टीव्ही सेंटर.
advertisement
2) कॅनॉट प्लेस व परिसर : एचडीएफसी बँक एटीएम चौक, बॉम्बे स्टेशनरी, वायझेड फोर्ड शोरूम सिडको रस्ता ते कॅनॉट.
3) गजानन महाराज मंदिर चौक व परिसर पतियाळा बँक ते गजानन महाराज मंदिर चौक, जवाहरनगर पोलिस स्टेशन समोर आदिनाथ चौक - ते गजानन महाराज मंदिर चौक.
4) कोकणवाडी चौक व परिसर पंचवटी चौक ते कोकणवाडी चौक, वेदांतनगर ते कोकणवाडी चौक.
5) गुलमंडी परिसर पैठण गेट ते गुलमंडी, औरंगाबाद बुक डेपो ते गुलमंडी.
हे आहेत पर्यायी मार्ग
टीव्ही सेंटर चौक: कलेक्टर ऑफिस ते एन-12
हडको कॉर्नर : एन-12, साठे चौक-दिल्ली गेट मार्गाने तुम्ही वाहतूक करू शकाल.
सेव्हन हिल्स : सेंट्रल नाका-बळीराम पाटील स्कूल
शरद टी पॉइंट : जिजाऊ चौक-एम 2 कडे जाण्यासाठी रस्ता चालू आहे.
कॅनॉट प्लेस एन-1 चौक : नोमीट नॉन हॉटेल चौक या मार्गाने तुम्ही वाहतूक करू शकाल.
गजानन महाराज मंदिर चौक : पतियाळा बँक- विजयनगर गजानन कॉलनी रिलायन्स मॉलमार्गे
जवाहरनगर पोलिस स्टेशन : डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या मागील रोडने त्रिमूर्ती चौकाकडे
कोकणवाडी चौक व परिसर: पंचवटी चौक ते कोकणवाडी चौकाकडे येणारी वाहने रेल्वे स्टेशनमार्गे जातील.
एसएससी बोर्ड ते कोकणवाडी चौकाकडे येणारी वाहने ही उस्मानपुरा तसेच चुन्नीलाल पेट्रोल पंपमार्गे जातील. विट्स हॉटेल वेदांतनगर ते कोकणवाडी चौकाकडे येणारी वाहने ही देवगिरी कॉलेज आयटीआय पीरबाजार उस्मानपुरामार्गे जाणार आहेत.