22 ऑक्टोबर रोजी एन-4 परिसरातील एका संस्थेच्या कार्यालयात ही घटना घडली. शिवराज जनसेवा अर्बन निधीचे अध्यक्ष शंकर अंबादास गोंडे यांनी पतीपासून विभक्त राहणाऱ्या आणि नोकरी शोधत असलेल्या महिलेची ओळख वाढवली. गोंडे यांनी तिला दहा हजार रुपयांच्या पगारावर बँकेत नोकरी दिली. मात्र, काही दिवसांतच या ओळखीचे रूपांतर आर्थिक आणि वैयक्तिक स्वार्थात झाले.
advertisement
गोंडे यांनी महिलेच्या नावावर एक कार (एमएच 20 जीके 3026) घेतली आणि ती स्वतः वापरू लागले. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. पीडितेने नोकरी सोडल्यावर गोंडे यांनी तिला त्रास देणे सुरू केले. यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून बदनामीचा मार्ग अवलंबला. 22 ऑक्टोबर रोजी त्यांनी पीडितेसोबतचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर टाकला.
सावधान! ई-बाईक ठरतेय जीवघेणा बॉम्ब, छ. संभाजीनगरच्या महिलेचा मृत्यू, पाहा काय घडलं?
एका बनावट इन्स्टाग्राम खात्याद्वारे अनोळखी व्यक्तीचा फोटो पोस्ट करून “हा माझा तिसरा यार शेख अहमद कसा आहे, कमेंट करा” असा बदनामीकारक मजकूर लिहिला. शिवाय, “मी तुला जगू देणार नाही, तुझी अशीच बदनामी करीन” अशा धमक्या दिल्या गेल्याची तक्रार महिलेने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात केली आहे.
दरम्यान, समाजमाध्यमे केवळ संवादाचे साधन राहिलेले नाहीत, तर ती आता वैयक्तिक सूड, ईर्षा आणि बदनामीची हत्यारे बनली आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून नात्यांची उभारणी करताना सावधगिरी आणि स्वसंरक्षणाची जाणीव आज अत्यंत आवश्यक झाली आहे.






