याबाबत मिळालेली माहिती अशी की, दोन मित्रांनी दारू प्यायल्यानंतर जालन्याहून छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. त्याच नशेत दोघांनी मोबाईलचे दुकान फोडले. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाले होते. जेव्हा त्या दोघांच्या घरी पोहोचले तेव्हा आपल्याच मुलांचा चोरी करत असलेला व्हिडीओ पाहून त्यांना धक्काच बसला.
Mumbai : दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; कोरोनाकाळात गमावला आधार अन्...
advertisement
चोरी करणाऱ्या मुलांच्या पालकांनी त्यांना घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठले. त्या दोघांची नावे अभिषेक राजू रिढे आणि आदित्य अनिल उघडे अशी असल्याचं समोर आलं आहे. दोघांपैकी एक जण आयटीआयचा तर दुसरा फार्मसीचा विद्यार्थी आहे. दोघांच्या पालकांनी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासमोर दोघांनाही हजर केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2023 4:50 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar : दारु प्यायले, मोबाईल शॉपी फोडली; चोरीचा व्हिडीओ पालकांनी पाहिला, दोघांनाही थेट...