Mumbai : दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; कोरोनाकाळात गमावला आधार अन्...
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड इथं उघडकीस आली आहे.
राजा मायाळ, मिरा रोड, 12 ऑगस्ट : दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मीरा रोड इथं उघडकीस आली आहे. तसंच आपल्यावर धर्मपरिवर्तनासाठी दत्तक पालकांकडून दबाव टाकला गेल्याचंही पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी 17 वर्षांची आहे. ती मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. करोनाकाळात तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता, तर आईने जानेवारीत आत्महत्या केली होती. त्यामुळे पीडित मुलगी व तिचे दोन भाऊ अनाथ आश्रमात राहात होते. दरम्यान, मीरा रोड येथे राहणाऱ्या एका कुटुंबाने पीडित मुलगी आणि तिच्या दोन लहान भावांना दत्तक घेतले होते.
advertisement
दत्तक घेतलेल्या कुटुंबातील 19 वर्षीय आरोपीने 8 ऑगस्टला पीडिता घरात झोपली असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पीडितीने शेवटी मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तिघांविरोधात बलात्कारप्रकरणी कलम ३७६, ३७६ (२) (एन) २९८, ५०६, ३४ सह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) कलम ४ आणि ८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यातील १९ वर्षीय आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी दिली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 12, 2023 4:05 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; कोरोनाकाळात गमावला आधार अन्...










