नांदेडहून सुटणारी गाडी (क्रमांक 07614) 17 ऑक्टोबर रोजी रात्री 8.50 वाजता सुटून 18 ऑक्टोबरला सकाळी 7.20 वाजता छत्रपती संभाजीनगरला पोहोचेल. तर मुंबईहून करीमनगरकडे जाणारी वातानुकूलित विशेष गाडी (क्रमांक 01021) 18 ऑक्टोबर रोजी रात्री 12.20 वाजता सुटणार असून, संभाजीनगर स्थानकावरही तिचा थांबा असेल.
दिवाळीआधी गोड बातमी! छ. संभाजीनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, कुणाला किती मिळणार?
advertisement
हिच गाडी परतीसाठी 18 ऑक्टोबरला सायंकाळी 5.30 वाजता करीमनगरहून सुटून 19 ऑक्टोबरला पहाटे 4.30 वाजता संभाजीनगरला येईल आणि पुढे मुंबईकडे रवाना होईल.
सणासुदीच्या काळात ही विशेष सोय म्हणजे प्रवाशांसाठी दिलासा आणि रेल्वे प्रशासनाकडून ‘ट्रॅव्हलचा बोनस गिफ्ट’च म्हणावा लागेल.
थांबे (दोन्ही दिशांना)
दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आर्मूर, मेटपल्ली, कोरटल आणि करीमनगर.