दिवाळीआधी गोड बातमी! छ. संभाजीनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, कुणाला किती मिळणार?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Diwali Bonus: छत्रपती संभाजीनगर महापालेकीतील कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी खूशखबर आहे. महापालिकेकडून बोनस जाहीर करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर: दिवाळीआधीच छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट दिलंय. महापालिकेने दिवाळी सणाच्या निमित्ताने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अटीशर्तींसह साडेतीन हजार रुपये सानुग्रह अनुदान देणार असल्याचे जाहीर केले. तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार रुपये अग्रीम रक्कम देण्यात येणार आहे. याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांनी माहिती दिली. त्यामुळे आता दिवाळीच्या तोंडावर 2 कोटी 42 लाख रुपये बाजारात येतील.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या विविध आस्थापनांवर कार्यरत असणाऱ्या 2205 चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी साडेतीन हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. त्यासाठी 77 लाख 17 हजार 500 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच दैनिक वेतनावर काम करणाऱ्या 11 हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 2 हजार रुपये प्रमाणे 22 हजार रुपये देण्यात येतील.
advertisement
महापालिकेच्या 115 बालवाडी शिक्षिकांना प्रत्येकी 2 हजार रुपयांनुसार 2 लाख 30 हजारांची तरतूद करण्यात आली आहे. तर 32 तासिका शिक्षकांना प्रत्येक 2 हजार रुपयांप्रमाणे 64 हजार रुपये भेट म्हणून दिले जातील. चार लिंक वर्कर्स, सुपरवायझर यांना देखील 2 हजार रुपयांप्रमाणे दिवाळीची भेट दिली जाईल. तर बचत गटातील 360 साफसफाई मजुरांना देखील 2 हजार रुपयांनुसार 7 लाख 20 हजार रुपयांची दिवाळीची भेट मिळेल.
advertisement
तिजोरीवर 2.42 कोटींचा भार
view commentsमहापालिका कर्मचाऱ्यांना अग्रीम, सानुग्रह अनुदान, दिवाळी भेटीपोटी पालिकेच्या तिजोरीवर 2 कोटी 42 लाख 4 हजार रुपयांचा भार पडणार आहे. पालिकेच्या विविध आस्थापनेवरील 686 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 12500 रुपये अग्रीम रक्कम मिळणार असून त्यासाठी 85 लाख 75 हजार रुपयांची तरतूद करावी लागली. तर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना देखील अग्रीम रकमेचा लाभ मिळेल. त्यासाठी 30 लाख 87 हजार 500 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
October 16, 2025 8:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
दिवाळीआधी गोड बातमी! छ. संभाजीनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, कुणाला किती मिळणार?