मराठवाड्यात जून महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप घेतली असून शेतकऱ्यांनी केलेली खरीपाची पेरणी संकटात सापडली आहे. त्यातच अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनी परभणी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असतांनाही पाणी सोडले जात नाही, याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
जालन्याला टाळं! ‘समृद्धी’बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, APMC मार्केट बंद!
तातडीने आवर्तन देण्याचा निर्णय
गेल्या काही काळात पावसाने दडी मारल्याने कापूस आणि सोयबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. तसेच उसाला देखील पाण्याची गरज आहे. मात्र, पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. जायकवाडीतून पाणी कधी सुटणार? याची अनेक शेतकरी वाट पाहात होते. त्यामुळे तातडीचे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा 40 हजार हेक्टर क्षेत्राला होणार असल्याचे सब्बीनवार यांनी सांगितले.
मुंबईत बैठक
मुंबईत झालेल्या बैठकीला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके, गेवराईचे विजयसिंह पंडीत, परभणीचे आमदार राहुल पाटील, गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे, पाथरीचे राजेश विटेकर, अंबडचे आमदार हिकमत उढाण, पैठणचे आमदार विलास भुमरे, तसेच कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार मुख्य अभिंयता कडा सुनंदा जगताप, अधिक्षक अभिंयता समाधान सब्बीनवार, बीडच्या अधिक्षक अभियंता पल्लवी जगताप यांची उपस्थिती होती.






