छत्रपती संभाजीनगर : आता लवकरच गौराई आणि गणपतीचे आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी सर्वत्र छान तयारी सुरू आहे. गौरी आणि गणपतीसाठी प्रत्येकजण चांगल्या मखरच्या शोधात असतो. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मखर उपलब्ध झाले आहेत. याचविषयी लोकल18 चा आढावा.
यंदाच्या गौरी-गणपतीच्या उत्साहात जर तुम्हाला सुंदर, छान असे आकर्षक मखर खरेदी करायचे असेल तर छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी या ठिकाणी जाऊन तुम्ही हे मखर खरेदी करू शकता. या ठिकाणी तुम्हाला अगदी स्वस्त दरात हे मखर उपलब्ध आहेत. या ठिकाणी महालक्ष्मीसाठी आणि गणपती बाप्पासाठी वेगवेगळ्या प्रकारचे, आकाराचे मखर उपलब्ध आहेत.
advertisement
हरतालिकेच्या पूजेमध्ये या गोष्टींचा समावेश करायला विसरू नका, अन्यथा मिळणार नाही उपवासाचं फळ
किंमतीचा विचार केला तर 1700 पासून याठिकाणी मखरच्या किंमती सुरू होत आहेत. तर गणपती बाप्पासाठीचे मखर 1500 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला लोखंडी आणि स्टील दोन्ही प्रकारचे मखर उपलब्ध आहे. यासोबतच मखरासाठी लागणारे पडदेही याठिकाणी विकले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही मखर हे पडद्यासहितही खरेदी करू शकता किंवा नुसते पडदेही खरेदी करू शकता.
Ganeshotsav Pune : गणपतीसाठी सुंदर देखावे सेट घ्यायचेय तर पुण्यातील हे ठिकाण तुमच्या कामाचं, VIDEO
यावर्षी या मखरांच्या किमतीमध्ये 100 रुपयांनी वाढ झालेली आहे, असे येथील विक्रेत्या उर्मिला यांनी सांगितले. तुम्हाला या ठिकाणी होलसेल आणि रिटेल दरात हे मखर मिळतील. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात जर तुम्हाला मखर खरेदी करायचे असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडी या ठिकाणी जाऊन हे मखर खरेदी करू शकता.