छत्रपती संभाजीनगर : आपल्या मुलांनी चांगल्या शाळेमध्ये शिकावं ही प्रत्येक पालकांची इच्छा असते. त्यासाठी पालक हे कितीही फीस भरण्यासाठी तयार असतात. अनेकांचा ओढा हा खासगी शाळेकडे दिसते. मात्र, याला छत्रपती संभाजी नगर शहरातील महानगरपालिकेची शाळा ही अपवाद आहे. प्रियदर्शनी ही शाळा एक आदर्श शाळा असून या शाळेमध्ये सर्व सोयीसुविधा आहेत.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिकेची केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक शाळा प्रियदर्शनी ही मयुरबन कॉलनी गादिया विहार याठिकाणी शाळा आहे. या शाळेत सर्व मोल मजुरी करणार्यांची मूले शिकण्यासाठी येतात. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीसुविधा या उपलब्ध आहेत. शाळेमध्ये प्रशस्त कम्प्युटर लॅब आहे. त्यासोबतच वर्गात शिकवण्यासाठी डिजिटल बोर्डदेखील आहेत. शाळेत विद्यार्थ्यांसाठी बचत बँकदेखील शाळेने सुरू केलेली आहे. तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयही आहे. याठिकाणी सर्व पुस्तके मुलांसाठी वाचण्यासाठी ठेवण्यात आले आहेत.
या शाळेत सर्व मोलमजुरी करणाऱ्या पालकांची मुले ही शिकण्यासाठी येतात. पण त्यासोबत शाळेमध्ये उच्चभ्रू वर्गातील जे पालक आहेत, त्यांची मुलेही शाळेत शिकण्यासाठी येतात. या शाळेमध्ये नायब तहसीलदाराची मुलगीही शिक्षण घेते. तसंच शाळेमध्येच सीबीएससी पॅटर्न आहे. यामध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांच्या अक्षरशः रांगा लागतात, असं येथील मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी सांगितले.
जीवघेणे रिल्स बनवत आहात, स्टंटबाजी करत आहात तर सावधान!, पोलीस करू शकतात ही कारवाई
या शाळेत गोरगरिबाची मुलं येतात. या मुलांनी कधी कॉम्प्युटर हे बघितलं नव्हतं, त्यांना या ठिकाणी कॉम्प्युटर शिकवलं जातं. यावर ते मुलं सर्व गोष्टी शिकतात. चित्र काढतात आणि यामुळे त्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान मिळते आणि त्यांच्या भवितव्यासाठीही हे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी आम्ही सर्व विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर हाताळायला देतो. त्यासोबतच मुलांना सर्व गोष्टी या शाळेत शिकता याव्यात, यासाठी शाळेमध्ये आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रम तसेच वेगवेगळे स्पर्धादेखील आयोजन करतो, असेही येथील मुख्याध्यापक म्हणाले.
विद्यार्थिनी काय म्हणाली -
मी पहिल्यांदा टीव्हीवर कॉम्प्युटर पाहिलं होतं. मला माहिती नव्हतं की, कॉम्प्युटर कसा असतो, कसं काम करतं, पण आमच्या शाळेतील शिक्षकांनी आमच्यासाठी कॉम्प्युटर लॅब सुरू केली आणि याठिकाणी आम्हाला कॉम्प्युटर हाताळायला शिकवले. आता मला कॉम्प्युटर हाताळता येते, त्यामुळे मला खूप आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया ईश्वरी नरवडे या विद्यार्थिनीने दिली.
तर मला शाळेत यायला खूप आवडतं, कारण की आमच्या शाळेमध्ये कॉम्प्युटर आहे. याठिकाणी मिळून चित्र काढतो. वेगवेगळ्या गोष्टी शकतो. तसेच आमच्या शाळेमध्ये ग्रंथालयही आहे. याठिकाणी पण मला छान अशी गोष्टींचे पुस्तके वाचायला मिळतात. त्यामुळे मला शाळेत जास्त वेळ थांबायला खूप आवडतं, असे साईराज गवळी या विद्यार्थ्याने म्हटले.





