सचिन पुंडलिक औताडे असं हत्या झालेल्या ३२ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो हर्सूलचा छावा संघटनेचा शहर प्रमुख आहे. सचिन औताडे यांचा प्रेमसंबंधातील अडथळ्यामुळे गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एक महिलेसह, तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन औताडे हा ३१ जुलैपासून बेपत्ता असल्याची तक्रार हर्सूल पोलीस ठाण्यात दाखल होती. १२ ऑगस्ट रोजी त्याचा मृतदेह आढळून आला, तेव्हा शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केल्यावर हा खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बेपत्ता तक्रारी तपासल्या असता, हा मृतदेह सचिन औताडे याचाच असल्याचे निष्पन्न झाले.
हत्येचे कारण आणि आरोपींचा शोध
पोलिसांच्या तपासात समोर आले की, प्रेमसंबंधातील अडथळ्यामुळे सचिनचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी बुलडाणा येथून दुर्गेश मदन तिवारी आणि भारती रवींद्र दुबे यांच्यासह आणखी एकाला ताब्यात घेतलं. प्राथमिक माहितीनुसार, ३१ जुलै रोजी तिवारी आणि भारती यांनी सचिनला बोलावून घेतले आणि त्यांच्या प्रेमसंबंधातील वादामुळे अफरोज खान याच्या मदतीने चाकूने त्याचा गळा चिरून खून केला. त्यानंतर मृतदेह कारमध्ये टाकून त्याची व गुन्ह्यात वापरलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्यात आली. मयत सचिन याने प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता, याच कारणातून ही हत्या झाल्याचं सांगितलं जातंय.
या घटनेनंतर मृताचा भाऊ राहुल पुंडलिक औताडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केलेल्या दोन्ही आरोपींना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयत सचिन याने आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता. याच कारणातून ही हत्या झाल्याचं सांगितलं जातंय. या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
