छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. लाडकी दीदी उपक्रमाच्या शुभारंभासाठी मोदी जळगाव येथे जाणार आहेत. यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा येथील विमानतळावरून ते जळगांवकडे रवाना होणार आहेत. मात्र,यावेळी पोलिसांकडून विमानतळा बाहेर तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीकडून मोदी यांच्या विरोधात काळे कपडे घालून निदर्शन करण्यात येणार आहे.
advertisement
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शने आंदोलन पार पाडणार आहे. यामुळे पोलिसांनी चिखलठाणा सह परिसरामध्ये कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अंबादास दानवे यांनी चिकलठाणा विमानतळजवळील असणाऱ्या मातोश्री लॉनजवळ पदाधिकाऱ्यांना काळे कपडे घालून देशभरात होणाऱ्या महिला अत्याचाराचा निषेध नोंदवण्यात येण्याचा इशारा दिला होता.
Pune Rain : पुणे पुन्हा पाण्यात! खडकवासलातून विसर्ग वाढवला, नदीकाठच्या घरांमध्ये शिरलं पाणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर येणार असून लखपती दीदी प्रशिक्षण सत्र आणि मेळाव्यात ते संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील ३० व देशातील ५० लखपती दिदींचे अनुभव,अडचणी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐकून घेणार आहेत. लखपती दिदी प्रशिक्षण सत्रात पंतप्रधान ६० मिनिटे भाषण करणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय ग्रामविकास मंत्री कमलेश पासवान,मुख्यमंञी एकनाथ शिदे,उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,अजित पवार आदी सह राज्यातील मंञी उपस्थित राहातील. सकाळी सव्वा अकरा ते १२ या वेळेत पंतप्रधान मोदी बचत गटाच्या महिलांसोबत संवाद साधणार आहेत.
खडसेंना निमंत्रण नाही, म्हणाले आता बोलावलं तरी जाणार नाही
पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार की नाही याबाबत विचारले असता एकनाथ खडसे यांनी म्हटलं की, शासकीय कार्यक्रम असल्यानं सर्व आमदारांना निमंत्रण देणं बंधनकारक होतं, पण मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं नाही. वेळेत निमंत्रण मिळालं असतं तर मी कार्यक्रमाला गेलो असतो. आता निमंत्रण मिळालं तरी जाणार नाही असं खडसे यांनी स्पष्ट केलं.
