गिरीष महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतली तेव्हा बोलताना म्हटलं की, उपोषणाचा नववा दिवस असून तब्येत ढासळली आहे. आता मागण्यांबाबत चर्चा झाली आणि मला वाटतं मार्ग निघाला पाहिजे. काल फडणवीस आणि अजित दादा यांना बोललो मार्ग निघून उपोषण सुटायला हवं. सगळ्यांनी सांगितलं आहे ओबीसी समाजाला धक्का बसणार नाही. मराठा-ओबीसी यांना चर्चा केली पाहिजे. दोघांनीही चर्चा केली पाहिजे.
advertisement
मुख्यमंत्र्यांना पाठवा! सरकारचे शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला येताच OBC कार्यकर्त्यांचा गोंधळ
दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावं, यावर चर्चेसाठी मुंबईला यावं अशी विनंती सरकारच्या शिष्टमंडळाने केली. सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, गोपीचंद पडळकर हे वडीगोद्री इथं पोहोचले होते. त्यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेवेळी ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांनी इथं चर्चेला यावं अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी शिष्टमंडळासमोरच गोंधळ घातला.
सरकार किंवा जरांगे यापैकी कुणीतरी खोटं बोलत असल्याचंही लक्ष्मण हाके म्हणाले. त्यांनी म्हटलं की, आम्ही ९ दिवसांपासून भूमिका मांडत आहे. निवेदनात आहे ते सगळं सांगू शकत नाही. सरकार म्हणतं ओबीसीला धक्का बसणार नाही. दुसरीकडे जरांगे म्हणतात आम्ही घुसलो आहोत. म्हणजे कुणी तरी खोटं बोलतंय. ग्रामीण भागातही ओबीसी लहान समूह सामाजिक मागास आहेत, त्यांचे काय होणार अशी शंका आहे.
