TRENDING:

मुख्यमंत्र्यांना पाठवा! सरकारचे शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला येताच OBC कार्यकर्त्यांचा गोंधळ

Last Updated:

Laxman Hake Maratha Reservation : लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपोषण मागे घ्यावं, यासाठी सरकारचं शिष्टमंडळ भेटीला पोहोचलं आहे. चर्चेतून आपल्या मागण्यांवर मार्ग निघेल असं गिरीश महाजन यांनी यावेळी म्हटलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिद्धार्थ गोदाम, छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी  ओबीसी आरक्षण (Obc Reservation) वाचवण्यासाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीचे आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष्मण हाके यांचं गेल्या ९ दिवसांपासून वडीगोद्री इथं उपोषण सुरू आहे. लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपोषण मागे घ्यावं  यासाठी सरकारचं शिष्टमंडळ भेटीला पोहोचलं आहे. चर्चेतून आपल्या मागण्यांवर मार्ग निघेल असं गिरीश महाजन (Girish Mahajan on Laxman Hake) यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान, शिष्टमंडळासमोरच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी यावं असं म्हटलं.
News18
News18
advertisement

सगे सोयरे अध्यादेश आणि ८ लाख हरकती संदर्भात जनतेसमोर म्हणणं मांडावं. ज्या कुणबी नोंदी नोंदवल्या गेल्या त्यांची श्वेतपत्रिका काढावी. सगेसोयरे याची व्याख्या नेमकी काय? ती भारतीय न्यायव्यवस्था किंवा न्याय निवाड्यात आहे का? असेल तर आम्हाला सांगावे नाहीतर सरकारनं नवं काहीतरी करण्याच्या फंदात पडू नये अशा मागण्या लक्ष्मण हाके यांनी केल्या आहेत.

advertisement

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावं, यावर चर्चेसाठी मुंबईला यावं अशी विनंती सरकारच्या शिष्टमंडळाने केली. सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, गोपीचंद पडळकर हे वडीगोद्री इथं पोहोचले. त्यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेवेळी ओबीसी समाज बांधव आक्रमक झाले. मुख्यमंत्र्यांनी इथं चर्चेला यावं अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी शिष्टमंडळासमोरच गोंधळ घातला.

advertisement

Maratha Reservation : जरांगेंच्या निर्णयाने OBC-मराठा संघर्ष टळला, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

राज्याने ही एकी पहिल्यांदा पाहिलीय. ओबीसी दऱ्याखोऱ्यात राहतात. सरकारने १२ कोटींची काळजी घ्यावी. ठराविक लोकांचीच दखल घेतली जाते. रेड कार्पेट टाकलं जातं असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं. ओबीसी कार्यकर्ते यावेळी संतप्त झाले आणि सरकारविरोधात घोषणाबाजीही केली गेली. मुख्यमंत्र्यांना बोलवा अशी मागणी ओबीसी समाज बांधवांनी केली.

advertisement

ऱाज्यातील आमच्या बांधवांचा हा रोष असून मी मोठा नाही. आम्ही सामान्य आहोत. ओबीसी नेते आणि स्थानिक ओबीसी बांधवांनी एकत्र बसावं. आम्हाला उत्तर नाही मिळालं तर आंदोलन असंच सुरू राहिल असं म्हणत हाके यांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. नेत्यांनी शपथ घेतलेली असते मग आमच्याकडे दुर्लक्ष का असा प्रश्न हाकेंनी विचारला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

आम्ही ९ दिवसांपासून भूमिका मांडत आहे. निवेदनात आहे ते सगळं सांगू शकत नाही. सरकार म्हणतं ओबीसीला धक्का बसणार नाही. जरांगे म्हणतात आम्ही घुसलो आहोत. कुणी तरी खोटं बोलतंय. ग्रामीण भागातही ओबीसी लहान समूह सामाजिक मागास आहेत, त्यांचे काय होणार अशी शंका लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मुख्यमंत्र्यांना पाठवा! सरकारचे शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला येताच OBC कार्यकर्त्यांचा गोंधळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल