नुकतेच मराठाड्यातील रेल्वेचं जाळं अधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गांच्या दुहेरीकरणासाठी 2189 कोटी रुपयांचा निधी दिला. यानंतर शुक्रवारी (1 ऑगस्ट) मराठवाड्यासह विदर्भातील खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या वेळी खासदार कराड यांनी छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांची सोय लक्षात घेत स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसची सुरू करण्याचे निवेदन वैष्णव यांना दिले.
advertisement
मराठवाड्याला मोठं गिफ्ट, छ.संभाजीनगर-परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी
दरम्यान, वंदे भारत एक्स्प्रेससाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील रेकचा कोटा उपलब्ध होत आहे. हा रेक उपलब्ध होताच छत्रपती संभाजीनगर ते मुंबई नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली जाईल, असे आश्वासन मंत्री वैष्णव यांनी दिल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.
वंदे भारतची वेळ बदलल्याने गैरसोय
मराठाड्यातील जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार नांदेडपर्यंत केला आहे. त्यामुळे वेळेत बदल झाला असून संबंधित रेल्वे दुपारी अडीच वाजता मुंबईत पोहोचते. यामुळे उद्योगनगरी छत्रपती संभाजीनगरकरांची मोठी गैरसोय होत आहे. आता नवी वंदे भारत मिळणार असल्याने छ. संभाजीनगरकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासदारांच्या शिष्टमंडळात खासदार डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शिवाजी काळगे, खा. बळवंत वानखेडे आंदीचा समावेश होता.