प्रतिपंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतलं अन्...
मृत धनंजय आत्माराम पडघम (34, मूळ रा. माजलगाव, जि.बीड) हा वाळूज भागात एकटा राहत होता. रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथील प्रतिपंढरपुरात त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले. दर्शनाचा व्हिडिओ त्याने आपल्या मोबाइलमध्ये शुट करून सोशल मीडियावरही शेअर केला होता. मात्र, या दर्शनानंतर अवघ्या काही वेळातच त्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा दुर्दैवी शेवट केला.
advertisement
तिची चौकशी करू नका...
आत्महत्या करण्यापूर्वी धनंजयने आपल्या एका मैत्रिणीला व्हाइस नोट पाठवली होती. या नोटमध्ये त्याने 'ती माझी मैत्रीण असल्याने तिला मेसेज केला आहे. तिला काही म्हणू नका, तिची चौकशी करू नका,' असे स्पष्ट केले. तसेच, 'माझ्यावर देणी झाल्याने मी जीवन संपवत आहे,' असे नमूद करत आपल्या आत्महत्येमागे आर्थिक अडचणी हेच प्रमुख कारण असल्याचे त्याने स्पष्ट केलं. त्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचललं.
पोलिसांनी मोबाईल तपासला अन्...
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी धनंजयचा मोबाइल तपासला असता, त्यात आत्महत्येचा व्हिडिओ आढळून आला. त्याच्या खिशात आधार कार्ड आणि पॅन कार्डही पोलिसांना मिळाले. एमआयडीसी वाळूज पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आर्थिक विवंचनेतून एका तरुणाने पवित्र आषाढीच्या दिवशी आपल्या आयुष्याचा असा करुण शेवट केल्याने या घटनेने परिसरात आणि नातेवाईकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
