छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धोतरा येथील प्राथमिक शाळेमध्ये सरला कामे या शिक्षिका आहेत. त्या विद्यार्थ्यांना बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून शिक्षण देतात. त्यांनी आतापर्यंत 75 पेक्षा जास्त पपेट्स म्हणजेच बोलक्या बाहुल्या तयार केल्या आहेत. विशेष म्हणजे सर्व बोलक्या बाहुल्या ह्या सरला कामे यांनी स्वतः तयार केल्या आहेत आणि त्यांचे ड्रेस देखील त्यांनी स्वतः तयार केले आहेत. दररोज त्या विद्यार्थ्यांना याच्या माध्यमातून चांगले विषय शिकवत असतात. त्यांनी आत्तापर्यंत अनेक अशा सामाजिक समस्यांवरती जनजागृती करण्याचं काम केलं आहे. त्या स्त्रीभ्रूण हत्या त्यासोबत मुलींचे शिक्षण, मतदान जनजागृती.
advertisement
तसेच मुलांना देखील या बोलक्या बाहुल्यांकडून शिकायला खूप मज्जा येते. विशेष म्हणजे सरला कामे अवघड अशा गणित विषय देखील या बाहुल्यांच्या माध्यमातून मुलांना शिकवण्याचे काम करतात. त्यासोबतच त्या मुलांना देखील या बोलक्या बाहुल्यांकडून शिकायला खूप आवडतं. त्यासोबतच मुलांना देखील बोलके बाहुले कसे बोलतात हे देखील शिकवण्याचं काम सरला कामे या करतात. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं काम या सरला कामे करतात.
आम्हाला देखील या बाहुल्यांकडून शिकायला खूप छान वाटतं. त्यासोबतच गंगुबाई आमची खूप आवडती आहे आणि आम्हाला मॅडम खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी शिकवतात आणि आम्हाला देखील खूप मज्जा येते, असं विद्यार्थिनींनी सांगितलं आहे.