सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे आणि नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी पोलीस आयुक्त सुधीर हिरमठ यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 (कलम 33(1)(ब)) तसेच मोटार वाहन कायदा 1988 (कलम 115) नुसार वाहतूक नियमनाचे आदेश जारी केले आहेत.
या कालावधीत भुयारी मार्गातून सर्व प्रकारच्या वाहनांना पूर्ण प्रवेश बंद राहील. वाहतुकीसाठी पुढील पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात शिवाजीनगर चौक, रेल्वेगेट मार्गे देवळाई चौककडे जाणाऱ्या भुयारी मार्गावरील रस्ता दुरुस्तीच्या कामा दरम्यान भुयारी मार्गावरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
advertisement
पर्यायी मार्ग
1) देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर उड्डाणपुलावरून जातील आणि येतील.
2) देवळाई चौक ते गोदावरी टी, एम.आय.टी., महानुभव आश्रम चौक, रेल्वे स्टेशन मार्गे जातील आणि येतील.
3) देवळाई चौक ते गोदावरी टी मार्गे संग्रामनगर भुयारी मार्गाने शहानुरमियाँ दर्गा चौकाकडे जातील आणि येतील.
4) देवळाई चौक ते गोदावरी टी, एम. आय.टी. चौक, महूनगर टी पॉईंट मार्गे उस्मानपुराकडे जातील आणि येतील.
5) शिवाजीनगर, सुतगिरणी चौक ते शहानुरमियाँ दर्गा चौक मार्गे संग्रामनगर उड्डाणपुलावरून जातील आणि येतील.
6) शिवाजीनगर चौक, धरतीधन सोसायटी, गादीया विहार मार्गे शहानुरमियाँ दर्गा चौक मार्गे जा.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बंदोबस्तावर असलेले अधिकारी आवश्यकतेनुसार मार्गात बदल करू शकतील. मात्र, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवा वाहनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 131 तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती शहर वाहतूक शाखा–1 चे पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांनी दिली आहे.






