Goshala: ना दान, ना सरकारी अनुदान, गाई जिवंत ठेवण्याचंच आव्हान, राज्यातील भयानक वास्तव!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Goshala: राज्यातील देशी गाईंचे संगोपन करणाऱ्या गोशाळा संकटात आहेत. गेल्या 8 महिन्यांपासून या गोशाळांचं अनुदान थकलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनेक गोशाळा आर्थिक संकटात सापडल्या आहेत. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून शासनाकडून मिळणारे अनुदान थकले असून, त्यामुळे गोशाळा चालकांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. याशिवाय, सरकारकडून अनुदान मिळते, अशी समजूत झाल्याने दानशूरांकडून येणाऱ्या देणग्यांमध्येही मोठी घट झाली आहे. परिणामी, गोधनाचे संगोपन करणे हे गोशाळांसाठी कठीण आव्हान बनले आहे.
दररोज एका गायीच्या चारापाणी, देखभालीसाठी सरासरी 200 रुपयांहून अधिक खर्च येतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तो खर्च उचलणे कठीण झाले आहे. जिल्ह्यात सध्या 33 मान्यताप्राप्त गोशाळा असून, त्यामध्ये सुमारे 1 हजार 802 गायी आहेत. यापैकी बहुतांश गायी वयोवृद्ध आणि कामासाठी अयोग्य आहेत.
advertisement
राज्य गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी गायींसाठी प्रतिदिन प्रती गाय 50 रुपये अनुदान देण्यात येते. पण हे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून मिळालेले नाही. त्यामुळे गोशाळाचालकांना आपले गोधन जिवंत ठेवण्यासाठी वैयक्तिक खर्च आणि थोड्याफार देणग्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सचिदानंद साखरे यांनी सांगितले की, “राज्यातील 66 जिल्ह्यांतील एकूण 330 मान्यताप्राप्त गोशाळांचे थकीत अनुदान लवकरच वितरित केले जाणार आहे.”
advertisement
चिकलठाणा येथील गोशाळाचालक मनोज बोरा (मामाजी) यांनी सांगितले की, “आम्ही वारंवार प्रस्ताव पाठवूनही अजूनपर्यंत एक रुपयाचेही अनुदान मिळाले नाही. गायींच्या चारापाण्याचा सारा खर्च आम्हाला दानशूरांच्या मदतीवरच भागवावा लागतो.” महागाई, थकलेले अनुदान आणि घटती देणगी या तिहेरी संकटात सापडलेल्या गोशाळा आज अक्षरशः जगण्यासाठी झटत आहेत.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 07, 2025 1:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Goshala: ना दान, ना सरकारी अनुदान, गाई जिवंत ठेवण्याचंच आव्हान, राज्यातील भयानक वास्तव!


