शाळेत 22 मुलींसोबत भयानक घडलं, एका पत्राने नराधमाला पकडलं, शर्मिष्ठा घारगेंचा राष्ट्रीय पदकाने गौरव
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांना यंदाचे केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांना यंदाचे केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर झाले आहे. एका निनावी पत्रावरून नामांकित शिक्षण संस्थेतील 22 मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आणत संवेदनशीलपणे तपास करून आरोपीला तब्बल चार वेळेस जन्मठेपेची शिक्षा लागेपर्यंत पाठपुरावा केला. 22 मुलींना दिला न्याय.
पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर सांगलीच्या उपअधीक्षकपदी कार्यरत असताना एका आश्रमशाळेत विद्यार्थिनींवर अत्याचार होत असल्याचे निनावी पत्र प्राप्त झाले होते. वालावलकर यांच्यासह उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी तपास करत संस्थेचा अध्यक्ष अरविंद पवारविरोधात 20 भक्कम साक्षीदार आणि 60 पुरावे निष्पन्न केले. त्याने 22 मुलींसोबत गैरप्रकार करून चार मुलींवर बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. या संवेदनशील तपासामुळे आरोपीला एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेप लागली.
advertisement
सांगली जिल्ह्यातील कुरुळप पोलीस स्टेशनमध्ये एक निनावी पत्र आले होते. त्या ठिकाणी असलेल्या उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांच्या नावावरती ते पत्र आले होते. त्या ठिकाणी मना नावाची आश्रमशाळा होती. या शाळेतील मुलींनी पत्र लिहिलेले असावे. आणि पत्र आल्यानंतर जेव्हा आम्ही सर्व चौकशी केली. चौकशी केल्यानंतर आम्हाला असे आढळले की त्या शाळेचा जो संचालक आहे त्यांनी या ठिकाणी असलेल्या सर्व मुलींवर अत्याचार केले आहेत. त्यानंतर आम्ही सर्व पुरावे गोळा केले आणि त्यानंतर मागच्या वर्षी या गुन्ह्याचा निकाल लागला आणि त्यानंतर आरोपीला एकाच गुन्ह्यात चार वेळा जन्मठेप झालेली आहे. सर्व 22 मुलींना न्याय मिळाला याचा मला खूप आनंद आहे.
advertisement
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
November 07, 2025 4:21 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
शाळेत 22 मुलींसोबत भयानक घडलं, एका पत्राने नराधमाला पकडलं, शर्मिष्ठा घारगेंचा राष्ट्रीय पदकाने गौरव

title=पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे वालावलकर केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक