Zarine Khan Death : जायद खानच्या आईवर हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार, सुझैनला आधार द्यायला पोहोचला ऋतिक रोशन
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Zarine Khan Death : गायिका-अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या निधनाच्या बातमीनंतर, लगेचच अभिनेता संजय खान यांची पत्नी आणि जायद खानची आई जरीन खान यांचे निधन झाले आहे.
मुंबई : बॉलिवूडसाठी २०२५ हे वर्ष खूपच दुःखद ठरत आहे. गायिका-अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या निधनाच्या बातमीनंतर, लगेचच अभिनेता संजय खान यांची पत्नी आणि जायद खानची आई जरीन खान यांचे निधन झाले आहे. ८१ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
वृद्धापकाळाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या जरीन खान यांच्यावर आज, शुक्रवारी, मुंबईतील जुहू येथील स्मशानभूमीत हिंदू रीतीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. जरीन खान यांच्या निधनाने अभिनेता जायद खान पूर्णपणे खचला आहे. त्याच्या आईच्या अंत्यसंस्काराचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.
जायदने आई जरीन खानला दिला अग्नी
जरीन खान यांचे अंत्यसंस्कार हिंदू पद्धतीने करण्यात आले. त्यामुळे मुलगा जायद खानने जानवे परिधान करून आईच्या पार्थिवाला अग्नी दिला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पंडितजी 'राम नाम सत्य' असे मंत्रांचे उच्चारण करताना ऐकू येत आहेत.
advertisement
advertisement
सुझैन खान आणि ऋतिक रोशन
संजय खान आणि जरीन खान यांना जायद खानसोबतच सुझैन खान ही मुलगी आहे, जी अभिनेता ऋतिक रोशनची एक्स-वाईफ आहे. आईच्या निधनाने सुझैन खान खूपच भावूक झाली होती. तिने आपल्या दोन्ही मुलांसोबत आईच्या पार्थिवाला खांदा दिला. या दुःखाच्या काळात सुझैन खानला साथ देण्यासाठी ऋतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हे दोघेही जरीन खान यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचले होते.
advertisement
advertisement
बॉलिवूडच्या दिग्गजांची उपस्थिती
पत्नीला अखेरचा निरोप देण्यासाठी अभिनेता संजय खान स्मशानभूमीत पोहोचले होते. पत्नीच्या निधनाने ते पूर्णपणे कोसळले होते, तेव्हा त्यांचे कुटुंबीय आणि मित्र त्यांना सावरताना दिसले.
advertisement
जरीन खान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जया बच्चन, शबाना आझमी, बॉबी देओल, पूनम ढिल्लों, जॅकी श्रॉफ, रकुल प्रीत सिंह, जॅकी भगनानी, अली गोनी आणि जस्मिन भसीन यांच्यासह अनेक मोठे कलाकार उपस्थित होते. जुहू स्मशानभूमीत जरीन खान यांच्यावर करण्यात आले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 07, 2025 6:51 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Zarine Khan Death : जायद खानच्या आईवर हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार, सुझैनला आधार द्यायला पोहोचला ऋतिक रोशन


