TRENDING:

Sanjay Sirsath : दिघेसाहेबांचा घातपातच; संजय शिरसाटांचा आरोप, उद्धव ठाकरेंचे नाव घेत विचारला प्रश्न

Last Updated:

संजय शिरसाट म्हणाले की, दिघे साहेबांच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी यांच्याकडे वेळ नव्हता. यांना माहीत होतं अंत्ययात्रेला गेलं तर लोक दगडाने ठेचून मारतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अविनाश कानडजे, 30 जुलै :  शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. आनंद दिघे यांच्या अंत्ययात्रेला का गेले नव्हते असा प्रश्न शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला. दिघे साहेबांनी आपलं आयुष्य शिवसेनेसाठी वेचलं त्यांच्या अंत्ययात्रेला उद्धव ठाकरे कुटुंबातील एकही माणूस उपस्थित नव्हता का नव्हता हा माझा प्रश्न आहे असं शिरसाट म्हणाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
दिघेसाहेबांचा घात, संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप
दिघेसाहेबांचा घात, संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप
advertisement

संजय शिरसाट म्हणाले की, दिघे साहेबांच्या अंत्ययात्रेला जाण्यासाठी यांच्याकडे वेळ नव्हता. यांना माहीत होतं अंत्ययात्रेला गेलं तर लोक दगडाने ठेचून मारतील. शिवसेनाप्रमुखांनी दिवे साहेबांवर आणि एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम केलं या लोकांमुळे शिवसेना वाढली. त्यांनी दहा शिवसैनिकांचं नाव सांगा ज्यांना उद्धव ठाकरेंनी उभं केलं. आपण ज्यांच्या जीवावर मोठे झालो त्यांचा विसर उद्धव ठाकरेंना पडला आहे. मराठी माणसाने पाठ फिरवली हे त्यांना समजलं म्हणून उत्तर भारतीयांना आपलंस करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांच्या घेतलेल्या सभेवर टीका केली.

advertisement

मुख्यमंत्री शिंदेंनी खड्डे पाहिले आणि आदेश देताच सूत्र हलली, पाहा PHOTO

आनंद दिघे यांच्या मृत्यूवरून संजय शिरसाट यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, ज्यांनी दिघे साहेबांचा घात केला त्यांना ठाण्याची जनता माफ करणार नाही. तुम्ही किती प्रश्न करा, किती घोषणा करा, ठाणेकर बदला घेण्यासाठी तयार आहे. दिघे साहेबांचा घातपात आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. डिस्चार्ज मिळण्याच्या मार्गावर असताना दिघे साहेबांचा मृत्यू झाला आणि लोकांनी ते सर्व पाहिले. दिघे साहेबांचा घातपातच असल्याचा पुनरुच्चार संजय शिरसाट यांनी केला.

advertisement

संजय शिरसाट यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरेंचे भाकीत खर आहे. त्यांना करो की मरो अशी परिस्थिती आहे. वैफल्य ग्रस्तेतून ते बोलत आहे, कारण 2024 मध्ये राज्यात आणि देशात मोदींची सत्ता येणार आहे. टोमणे मारण्याच्या नजरेतून त्यांनी पहायला पाहिजे. आमच्या सोबत जी गर्दी आहे ती खरी गर्दी आहे. त्यांना पक्ष प्रवेश घेऊन सभा घ्यावी लागते आम्हाला त्याची गरज नाही. मोठाले नेते आमच्यासोबत येण्याच्या मनस्थितीत आहे ते लवकरच येतील.

advertisement

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी चिटकून राहिलो असतो तर समृद्धी मार्ग पाहायला मिळाले नसता. चांगले प्रोजेक्ट येणार असली की त्याचा विरोध करणं भांडवल करणे हा त्यांचा धंदा आहे. संजय राऊतांनी भरून भरून उद्धव ठाकरेंना सांगितलं तोच सर्व उध्वस्त करेल. संजय राऊत मूर्ख माणूस असल्याची टीकाही संजय शिरसाट यांनी केली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sanjay Sirsath : दिघेसाहेबांचा घातपातच; संजय शिरसाटांचा आरोप, उद्धव ठाकरेंचे नाव घेत विचारला प्रश्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल