या अपघातात समाधान सिताराम दांडगे हा जागीच ठार झाला तर आई सुशीलाबाई सिताराम दांडगे या गंभीर जखमी झाल्या आहेत. समाधान दांडगे त्यांची आई सुशीलाबाई दांडगे हे माय-लेक सोमवारी सकाळी कडेठाण येथून आपले शेतीचे पीएम किमान योजनेची पैसे येत नसल्याने पैठण येथील तहसील कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. तेथील काम आटोपून सायंकाळी हे दोघेजण आपल्या गावी कडेठाण येथे जात होते. ते दोघे पाचोड-पैठण दावरवाडी शिवारात येताच समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. यात समाधान दांडगे याला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला तर त्याची आई सुशीलाबाई दांडगे या गंभीर जखमी झाल्या आहे.
advertisement
वाचा - अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणात मोठी अपडेट, आरोपी ऋषीकेश बेदरेला जामीन मंजूर
पुणे जिल्ह्यात अपघातात 10 ठार
पुणे जिल्ह्यातील नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा जवळ रविवारी भीषण अपघात झाला आहे. रिक्षा, पिकअप आणि ट्रक असा तिहेरी अपघात घडला. या घटनेत 10 जण ठार झाल्याची माहिती आहे. यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगा जवळ प्रवासी रिक्षा, पिकअप आणि ट्रक असा तिहेरी अपघात झाला. यात एकूण 10 जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जुन्नर तालुक्यातील मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती, पत्नी व दोन लहान मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. एकूण मयतांची संख्या 10 आहे. गणेश मस्करे -30 वर्ष, कोमल मस्करे - 25 वर्ष, हर्षद मस्करे - 4 वर्ष, काव्या मस्करे - 6 वर्ष, अशी मृतांची नावे असून उर्वरित मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
