आदर्श शिक्षिका डॉ सविता मुळे
छत्रपती संभाजीनगरमधील श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉ. सविता जयंत मुळे यांना नुकताच थोर समाज सुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
Video: शाळेच्या भिंतीही लागल्या बोलू.., कोरोना काळातील अनोख्या कामासाठी शिक्षकाला मोठं बक्षीस
advertisement
डॉ मुळे यांचा शिक्षण प्रवास
डॉ. मुळे यांचं एम.एससी. न्यूक्लिअर फिजिक्स, B.Ed, M.Ed अशं शिक्षण झालं असून कीर्तनशास्त्र विषयात त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही घेतलंय. तसेच यासाठी त्यांना सुवर्णपदक मिळालं असून कीर्तनशास्त्रातून पीएचडी संशोधनही त्यांनी केलं आहे. तसेच कीर्तन शास्त्रासाठी आकाशवाणी कडून घेतली जाणारी केंद्रीय ऑडिशन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या त्या पहिल्या महिला देखील आहेत.
कोविड काळात ऑनलाईन शिक्षण
कोविड काळामध्ये शाळा बंद होत्या. तरदेखील त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची आणि गणिताची गोडी लागावी यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यासाठी स्वत:चं युट्युब चॅनल सुरू केलं. तसेच मूल्यशिक्षण व वाचन संस्कार रुजवण्यासाठी त्यांनी 'गोष्ट तुमची आमची' हे यूट्यूब चैनल सुरू करून विद्यार्थ्यांना धडे देखील दिले.
9 वर्ष राहिले कुलगुरू पण सॅलरी घेतली फक्त 1 रुपये, सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रेरणादायी कहाणी
समाज प्रबोधनासाठी कीर्तन
डॉ मुळे या समाज प्रबोधन या विषयावरती कीर्तन देखील करतात. आपल्या कीर्तनातून जनजागृती करण्याचं काम त्या सातत्यानं करत आहेत. आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यामध्ये आलेला आहे.
विद्यार्थ्यांमुळे मिळाला पुरस्कार
हा पुरस्कार भेटल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. हा पुरस्कार माझ्या सर्व विद्यार्थ्यांमुळे मला भेटलेला आहे. तसेच इथून पुढे देखील मी माझं कार्य असंच अविरतपणे ठेवणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा कसा होईल याचा मी विचार करणार आहे. तसेच माझ्या संपूर्ण कुटुंबांची व माझ्या सर्व गुरुवरांचे मी आभार मानते, असे मुख्याध्यापिका डॉ सविता मुळे म्हणतात.