छत्रपती संभाजीनगर : आपण आपला स्वतःचा छोटासा का होईना एक व्यवसाय सुरू करावा आणि त्याच्यातून जे पण उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नातून आपल्या घराला हातभार लावावा, प्रत्येक महिलेची इच्छा असते. असंच एक स्वप्न छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या शिवकन्या पाटील यांनी पाहिले. त्यांनी देखील स्वतःचा एक छोटा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या व्यवसायातून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावत आहेत. त्यांनी हा व्यवसाय नेमका कसा सुरू केला, काय आहे यामागची कहाणी हे आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
शिवकन्या पाटील या मूळच्या जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यामधील आहेत. परतूर येथे राहत असताना त्या इतरांच्या शेतामध्ये जाऊन मोलमजूरी करायच्या आणि मिळालेल्या पैशांतून स्वतःचे घर चालवायच्या. आपल्या मुलींनी चांगले शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात येण्याचा निर्णय घेतला.
या ठिकाणी आल्यानंतर शिवकन्या पाटील यांचे पती एका खाजगी कंपनीमध्ये कामाला लागले. पण मुली लहान असल्यामुळे बाहेर जाऊन काम करन त्यांना शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी घरातूनच काहीतरी सुरू करायचा निर्णय घेतला आणि त्यांनी घरातूनच वेगवेगळे पदार्थ करून विकायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी पापड, लोणचं असे विविध पदार्थ करून लोकांच्या घरोघरी जाऊन विकायला सुरुवात केली. काही लोकांनी त्यांना प्रोत्साहन दिले तर काही लोकांनी त्यांना प्रोत्साहन नाही दिले. तरीही त्यांनी न खचता हा व्यवसाय असाच चालू ठेवला आणि आज त्यांचा या व्यवसायाचे स्वरुप मोठे झाले आहे.
त्यांनी या व्यवसायातून आता सर्व पदार्थ विक्रीला सुरुवात केलेली आहे. यामध्ये ते शेवया, पापड, लोणचे, चिवडा, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या करून त्या विकतात. तसंच त्यांनी एका बचतगट स्थापना केला आहे. यामध्ये त्यांनी अनेक महिलांना रोजगार दिला आहे. त्या व्यवसायामधून ते लाखो रुपयांचे उत्पन्न कमवत आहेत. शिवकन्या पाटील आज आपल्या या व्यवसायातून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावत आहेत. पण त्यासोबत त्यांनी इतरांना रोजगारही निर्माण करून दिला आहे.
मी न खचता सर्व कामे केले. इतर महिलांनीही त्यांना कुठलीही अडचण आली तरी न खचता खंबीरपणे आपला व्यवसाय चालू ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.