गुन्हा दाखल करण्याचे आदेश
मालवण येथील घटनेबद्दल मंत्री रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली आहे. सिंधुदुर्गातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी ही नौदलाची होती. तसेच 20 ऑगस्टला महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी नौदलाला पत्र देखील देण्यात आलं होतं. पुतळ्यावर समुद्राच्या पाण्याची खारी हवा बसल्याने डस्ट जमा होऊन पुतळा कोसळला असावा, असा कयास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. तर पुतळा उभारला त्यांच्यावर सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय फोडलं ही जनभावना, त्यांना ही घटना कशी घडली हे भेटून सांगेन, अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली.
advertisement
वाचा - '...त्याला जेलमध्ये टाका', शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जरांगे संतापले
पुतळा का कोसळला?
‘तिथे 45 किलोमीटर प्रती तास असा वारा वाहत होता, त्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी गेले आहेत. नेव्हीचे अधिकारी, आमचे काही अधिकारी उद्या पाहणी करतील. छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत आहे, हा पुतळा आम्ही पुन्हा दिमाखात आणि मजबुतीने उभा करू. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. या राज्यात शांतात राहिले पाहिजे, यासाठी सगळ्यांनी काळजी घ्यावी’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.