बिडकीन पोलिस ठाण्यात पोलीस कर्मचारी समीना अहमद शेख या ड्युटीवर असताना संशयित आरोपी रजिया शेख ही ठाण्यातील पीएसओ रूममध्ये आली. तू मला काय बोललीस? असे म्हणत तिने पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या समीना अहमद शेख यांना अरेरावी करत शिवीगाळ केली.
यानंतर तिने कपडे ओढून गालात चापट मारली आणि गळ्यातील दोन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता, तिने महिला पोलिसाला ठार मारण्याची धमकीही दिली. त्यावेळी पोलीस ठाण्यात होत असलेल्या मारहाणीचा एका खासगी व्यक्तीने मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ काढला.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
July 15, 2025 7:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संशयित आरोपी सोबत आली, पोलीस ठाण्यात महिला पोलिसाला मारहाण, सोन्याची चेन हिसकावली
