राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुलैमध्ये विमानतळाची पाहणी केली होती. सर्व कामं सप्टेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. 2 हजार 866 एकर क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्वात अगोदर इंडिगो एअरलाईन्स सेवा देणार आहे. या विमानतळावरून दरवर्षी सुमारे 90 दशलक्ष प्रवासी आणि 3.2 टन मालवाहतूक केली जाईल. या विमानतळामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावरील ताण कमी होणार आहे.
advertisement
Weather Alert: पश्चिम महाराष्ट्रात वारं फिरलं, पुण्यासह 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट
कनेक्टिव्हिटीमध्ये होणार अमूलाग्र बदल
या विमानतळावर अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह सक्षम दळवळण यंत्रणा उपलब्ध केल्या आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, गोवा हायवे आणि जेएनपीटी पोर्टच्या अगदी जवळ असल्याने अनेकांचा प्रवास सोपा होणार आहे. याशिवाय मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू हा पूल देखील विमानतळाला जवळ असल्याने वाहतूक आणखी सोपी होणार आहे. शिवाय, एमएसआरटीसीकडून ठाणे, वाशी, दादर आणि पनवेलहून एअरपोर्ट एक्सप्रेस बस सुरू करण्याचं नियोजन आहे. इलेक्ट्रिक बसला यामध्ये विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे.
सिडकोच्या माध्यमातून 9 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारला जात आहे. तो थेट विमानतळावरील टर्मिनलला जोडला जाणार आहे. खारघर, उळवे, पनवेल परिसरात नव्या टाउनशिप, बिझनेस पार्क आणि लॉजिस्टिक हब उभारणीला वेग आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधी निर्माण होणार आहेत.