TRENDING:

नक्षली चळवळीचा म्होरक्या, 6 कोटींचं बक्षीस, CM फडणवीसांसमोर घेणार शरणागती

Last Updated:

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज थेट गडचिरोली गाठणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी आपला सोलापूरचा नियोजित दौरा रद्द न करता आधी थेट गडचिरोली गाठणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दौऱ्यात ऐन वेळी बदल केल्याने चर्चांना उधाण आले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अचानकपणे दौऱ्यात केलेल्या बदलाचे कारण समोर आले आहे.  आजची घटना ही राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. 

advertisement

नक्षलवादी चळवळीच्या मुळावर घाव घालणारी घटना आज घडणार आहे. नक्षली चळवळीचा म्होरक्या, तब्बल 6 कोटींचे बक्षिस असलेला माओवादी नेता मल्लोजुला राव उर्फ ‘भूपती’ आज एका कार्यक्रमात शरणागती पत्करणार आहे. त्याच्यासोबत 50 हून अधिक नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पण करणार आहेत. माओवादी चळवळीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नेता असलेल्या भूपतीने शरणागती स्वीकारणे मोठी घडामोड समजली जात आहे.

advertisement

माओवाद्यांच्या संघटनेत सर्वोच्च असलेला, 40 दशकं माओवादी संघटनेला उंचीवर नेणारा त्यांचा बौद्धिक चेहरा अशी ओळख असलेला मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने सुरक्षा यंत्रणांसमोर शस्त्र टाकले आहेत. गडचिरोली पोलिसांसमोर त्याने सोमवारी रात्री शरणागती पत्करल्याची माहिती समोर आली होती.

advertisement

भूपतीने याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच शरणागती पत्करण्याची भूपतीने ठेवलेली अट ठेवली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचा नियोजित दौऱ्याचं नियोजन बदललं असून आधी गडचिरोलीला प्राधान्य दिलं आहे. त्यानंतर ते सोलापुरात जाणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आज स्वतः गडचिरोलीत उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार राहणार आहेत.

भूपती हा नक्षल संघटनेतील अत्यंत प्रभावी आणि रणनीतिक विचारवंत कमांडर मानला जातो. त्याच्या ताब्यात असलेल्या गडचिरोलीबस्तर पट्ट्यातील मोठ्या संघटनेचे जाळे राज्य सरकारसाठी वर्षानुवर्षे डोकेदुखी ठरले होते. मात्र मागील काही महिन्यांपासून पोलिसांच्या यशस्वी कारवायांमुळे भूपतीसह अनेक नक्षलवाद्यांनी शस्त्रं खाली ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

advertisement

या मोठ्या शरणागतीमुळे नक्षल चळवळीला तडाखा बसणार असून गडचिरोली जिल्ह्यातील शांतता प्रस्थापनेसाठी हा एक निर्णायक टप्पा ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुप्तचर विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भूपतीची पत्नीसह कुटुंबातील दोन सदस्यांनी या वर्षात आत्मसमर्पण केले आहे.. भूपतीसोबत 60 माओवादी आत्मसमर्पण करत आहेत. यातील बहुतांश हे गडचिरोली जिल्ह्यातले माओवादी असल्यामुळे हा जिल्हा आता माओवाद मुक्त होण्याच्या मार्गावर आलेला आहे.

भूपतींवर 6 कोटींचे बक्षीस...

1970 च्या दशकात माओवादी संघटना पीपल्स वर ग्रुप मध्ये प्रवेश करणारा वेणूगोपाल उर्फ भूपती याची कारकीर्द गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यातून सुरू झाली. मोठा माओवादी नेता मल्लोजुला कोटेश्वरराव उर्फ किशनजी याचा भूपती हा लहान भाऊ आहे. संपूर्ण देशभरात 6 कोटीपेक्षा अधिक बक्षिसाची रक्कम भूपतीवर जाहीर करण्यात आली होती.

माओवाद्यांच्या संपूर्ण संघटने संदर्भात असलेल्या धोरणांमध्ये बौद्धिक चेहरा म्हणून भूपतीने मोठी भूमिका बजावली आहे. अनेक मोठ्या हिंसक घटना ज्या घडलेल्या आहेत त्यांसह माओवाद्यांच्या संघटनेची स्थानिक पातळी पासून केंद्रीय समितीपर्यंत आखणी करण्यात, त्यात वेळोवेळी बदल करण्यात भूपतीची मोठी भूमिका राहिली आहे. अभय नावाने भूपती कडून अनेकदा पत्रकही जारी करण्यात आली आहेत. भूपती हा माओवादी संघटनेच्या इतिहासातील मोठा चेहरा आहे..

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीला फक्त 40 रुपयांपासून लायटिंग, मुंबईतलं होलसेल मार्केट, पाहा लोकेशन
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नक्षली चळवळीचा म्होरक्या, 6 कोटींचं बक्षीस, CM फडणवीसांसमोर घेणार शरणागती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल