तसेच इलेक्ट्रीकल मोटार कार, बसेस यांनाही अटल सेतूच्या पथकरातून पूर्ण सूट देण्याबाबतचा मुद्दाही अधिसूचनेत समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे ई- व्हेईकल्स धारक तसेच अन्य वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाने ४ जानेवारी २०२४ रोजीच्या बैठकीत अटल सेतूच्या वापराकरिता पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणेच पुढे १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इतर वाहनांकरिता एकेरी प्रवासाचा पथकर दर ही निश्चित करण्यात आले. ते पुढीलप्रमाणे आहेत.
advertisement
१-जीप- २५० रूपये, व्हँन-२०० रूपये, हलके मोटार वाहन-५० रूपये.
२- हलके व्यावसायिक वाहन-४०० रूपये, हलके मालवाहू वाहन-, ३२० रूपये, मिनी बस- ८० रूपये
३- ट्रक अथवा बस ( दोन आसांचे)-८३० रूपये, ६५५ रूपये, १७० रूपये
४- तीन आसांचे व्यावसायिक वाहन- ९०५ रूपये, ७१५ रूपये, १८५ रूपये
५- अवजड बांधकाम यंत्रसामग्री-१३०० रूपये, जमीन खोदाई यंत्रसामग्री-१०३० रूपये, अधिक आसांचे वाहन-१२७० रूपये
६- अति अवजड वाहन- १५०० रूपये, सात अथवा त्यापेक्षा अधिक आसांचे वाहन १२५५ रूपये, ३२५ रूपये
