जागावाटपावरून वाद वाढणार
आमदार राजेश क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वीच शिवसेना 30 जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. यावर बोलताना धनंजय महाडिक म्हणाले की, "कुणी काय मागणी करावी हा त्यांचा प्रश्न आहे, पण आम्ही आमच्या जुन्या 24 जागांपैकी एकही जागा सोडणार नाही." या भूमिकेमुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांनी मिळून 78 जागांवर दावा केल्याने राष्ट्रवादीने काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
advertisement
‘शेत पाइपलाइन’वरून टीका
‘शेत पाइपलाइन’ योजनेतील त्रुटींवरून महाडिक यांनी काँग्रेसवर टीका केली. "योजनेतील त्रुटी ज्यांनी राबवली त्यांनीच दूर केल्या पाहिजेत. भाजप किंवा महायुती ते पाप घेणार नाही," असे ते म्हणाले.
इतर मुद्दे
- निवडणूक : कोल्हापूर शहराची हद्दवाढ सुरू असली तरी, निवडणुकीचा आणि हद्दवाढीचा संबंध नाही. निवडणूक ठरलेल्या वेळेनुसारच होईल, असा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.
- गोकुळमधील वाद : गोकुळच्या ठरावावरून झालेल्या हाणामारीच्या घटनेवर त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली. "महादेवराव महाडिक यांच्या काळात गोकुळमध्ये असे प्रकार कधीच घडले नाहीत. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी काही नवे प्रयोग सुरू केल्यामुळे असे घडत आहे," असे ते म्हणाले.
हे ही वाचा : 'आमदार आम्ही, तर 30+ जागाही आम्हालाच हव्यात', कोल्हापूर महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदेसेनेने सांगितला 'हक्क'
हे ही वाचा : इस्लामपूरचं राजकारण तापलं! पडळकरांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या 'या' नेत्याचा होणार फायदा; सदाभाऊंचं म्हणणं काय?