'आमदार आम्ही, तर 30+ जागाही आम्हालाच हव्यात', कोल्हापूर महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदेसेनेने सांगितला 'हक्क'
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
Kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी महायुतीत 30 हून अधिक जागांची मागणी करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून...
Kolhapur Politics : कोल्हापूर शहर शिंदेसेनेचा बालेकिल्ला आहे आणि महापालिका निवडणुकीत महायुतीतून आम्हाला 30 हून अधिक जागा मिळायला हव्यात, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. रविवारी शिवाजी पेठेतील एका मेळाव्यात ते बोलत होते.
शिंदेसेनेला 30+ जागांची मागणी
आमदार क्षीरसागर म्हणाले की, शहरात माझ्या रूपात शिंदेसेनेचा आमदार आहे आणि माझ्या मतदारसंघात 54 नगरसेवक येतात. त्यामुळे महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढली तरी, शिवसेनेला कोणतीही मतभिन्नता निर्माण होऊ न देता 30 हून अधिक जागा मिळाल्या पाहिजेत. शिवाजी पेठेत शिंदेसेनेचा प्रभाव अधिक असून, येथील चारही नगरसेवक महायुतीचेच निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
advertisement
40-50 कोटींच्या आरोपांवरून प्रत्युत्तर
जून 2022 मध्ये शिंदे सरकारसोबत गेल्यानंतर त्यांच्यावर 40-50 कोटी रुपये घेतल्याचा आरोप झाला होता. या आरोपांवर बोलताना क्षीरसागर म्हणाले, "मी सर्व आरोपांना कामातून उत्तर दिले आहे. आता परिस्थिती बदलली आहे आणि आम्ही शहरात महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे."
काँग्रेसवर टीका
शहरातील विकासाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. "मतदारांनी इतकी वर्षे महापालिकेची सत्ता काँग्रेसकडे दिली होती, पण त्यांना शहराचा विकास करता आला नाही. थेट पाइपलाइन योजनेत 70 कोटींचा भ्रष्टाचार झाला. प्रत्येक दिवाळीत त्या पाण्यातून आंघोळ केली जाते, पण शहराची पाण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही," असे म्हणत त्यांनी मतदारांना यावेळी महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले.
advertisement
हे ही वाचा : शिंदेंच्या पराभूत नेत्याला 20 कोटी निधी? सरवणकरांच्या दाव्याने सरकार अडचणीत, अजितदादांचे हात वर!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 8:24 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'आमदार आम्ही, तर 30+ जागाही आम्हालाच हव्यात', कोल्हापूर महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदेसेनेने सांगितला 'हक्क'