BMC Election: शिंदेंचा प्लॅन बी सुरू! मुंबई महापालिकेत ठाकरेंना धक्का, भाजपलाही चकवा?

Last Updated:

Eknath Shinde Uddhav Thackeray:मुंबई महापालिका हा ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो. आता बालेकिल्ला सर करून ठाकरेंना जोरदार धक्का देण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाने सुरू केली आहे.

शिंदेंचा प्लॅन बी सुरू! मुंबई महापालिकेत ठाकरेंना धक्का, भाजपलाही चकवा?
शिंदेंचा प्लॅन बी सुरू! मुंबई महापालिकेत ठाकरेंना धक्का, भाजपलाही चकवा?
मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता काही महिन्यांचा अवधी असताना दुसरीकडे सगळ्याच राजकीय पक्षांकडून आढावा घेत तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिका हा ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो. आता बालेकिल्ला सर करून ठाकरेंना जोरदार धक्का देण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाने सुरू केली आहे. शिंदे गटाने आपला प्लॅन बी सुरू केला असून ठाकरेंसह भाजपही अडचणीत येण्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपकडून 150 जागा लढवण्याची तयारी सुरू आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून किमान 100 जागांची मागणी केली जात असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने प्रभाग पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे. किरकोळ कामे सुरळीत व्हावीत आणि स्थानिक पातळीवर नाराजी वाढू नये, यासाठी नुकतेच शिंदे गटात दाखल झालेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात महापालिकेतर्फे विशेष निधी उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी ठाकरे गटातील माजी नगरसेवकांना आपल्या गटात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 100 हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये 2017 मध्ये ठाकरेंकडून निवडून आलेल्या सुमारे 45 नगरसेवकांचा समावेश आहे. यशवंत जाधव, समाधान सरवणकर, शितल म्हात्रे, राजुल पटेल आणि राजू पेडणेकर यांसारखे माजी नगरसेवक या यादीत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
advertisement
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ समाप्त होऊन साडेतीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात प्रभागातील लहानमोठ्या कामांना अडथळे आले. परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. त्याचा परिणाम आगामी निवडणुकीवर होऊ नये म्हणून शिंदे गटातील माजी नगरसेवकांना 1 ते 2 कोटी रुपये तर काही ठिकाणी तब्बल 5 कोटी रुपयांपर्यंत निधी देण्यात येत असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. या निधीमुळे प्रभाग मजबूत होऊन नागरिकांचा विश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.
advertisement
या निधीमधून झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते, शौचालय दुरुस्ती, लहान मोठी गटारांची दुरुस्ती, छोटे मोठे लादीकरण, सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी पाईपलाईन व अन्य सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे. स्थानिक पातळीवरील ही कामे महत्त्वाची ठरतात. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्याआधी एकनाथ शिंदे यांच्याकडून आपल्या गोटातील माजी नगरसेवकांना अधिकाधिक बळ दिले जात असल्याचे चित्र आहे.
advertisement
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Election: शिंदेंचा प्लॅन बी सुरू! मुंबई महापालिकेत ठाकरेंना धक्का, भाजपलाही चकवा?
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement