TRENDING:

Kalyan Dombivli : कल्याण-डोबिंवलीला कोरोनाचा विळखा? तिसऱ्या बाधिताच्या मृत्यने उडाली खळबळ

Last Updated:

Kalyan Dombivli Coronavirus : मागील काही दिवसांपासून रा्ज्यासह देशभरात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबई आणि महानगर भागांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण-डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बुधवारी करोनाचा तिसरा बळी नोंदवण्यात आला आहे. मृत व्यक्ती हे 77 वर्षांचे असून, ते डोंबिवलीतील रहिवासी होते. संबंधित रुग्णाला 28 जून रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना इतर आजारही होते. त्या आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
file photo
file photo
advertisement

मागील काही दिवसांपासून रा्ज्यासह देशभरात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मुंबई आणि महानगर भागांमध्येही कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. या मुंबई महानगर क्षेत्रात 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. या मृत कोरोनाबाधितांना इतर काही आजार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे मृत्यू फक्त कोरोनामुळेच झाले आहेत, असे समजणे चुकीचे असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलेय

advertisement

समोर आलेल्या वृत्तानुसार, प्राथमिक चाचणीत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, या रुग्णास कॅन्सरचा आजारही होता. उपचार सुरू असतानाच बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. आधीच इतर आजारांनीग्रस्त असलेल्या कोरोनाबाधित धोका अधिक असल्याचेही पुन्हा अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची नोंद घेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत देशातील सध्याची करोना परिस्थिती, रूग्णांमध्ये आढळणारी लक्षणे, तसेच जानेवारीपासून आतापर्यंत झालेल्या मृत्यूंच्या वैद्यकीय पार्श्वभूमीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

advertisement

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी), आयसीएमआर, आयडीएसपी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.

या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व सार्वजनिक आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑक्सिजन साठा, विलगीकरणासाठी आवश्यक खाटा, व्हेंटिलेटर्स आणि औषधांचा साठा सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, ऑक्सिजनपुरवठ्याची कार्यपद्धती तपासण्यासाठी 'मॉक ड्रिल'ही घेण्यात आली आहे. कोविडच्या नव्या रुग्णवाढीने प्रशासन पुन्हा एकदा सावध झाला असून, नागरिकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kalyan Dombivli : कल्याण-डोबिंवलीला कोरोनाचा विळखा? तिसऱ्या बाधिताच्या मृत्यने उडाली खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल