आज झालेल्या सुनावणीत वाल्मीक कराडच्या वकिलाने दाखल केलेल्या डिस्चार्ज अॅप्लिकेशनला सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांनी जोरदार विरोध केला. यावर दोन्ही बाजुने जोरदार युक्तिवाद झाला. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी पक्ष व आरोपींच्या वकिलाकडून कोर्टात इतरही काही अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ते सगळे एकत्रित करून 17 तारखेला त्यावर सुनावणी घेऊ, असा आदेश कोर्टाने दिला आहे. त्यानुसार 17 जूनला पुढील सुनावणी होणार आहे.
advertisement
आज वाल्मीक कराडच्या डिस्चार्ज अॅप्लिकेशनवर सुनावणी होणार होती. पण आरोपीवर इतरही गुन्हे दाखल आहेत. मग केवळ डिस्चार्ज अॅप्लिकेशनवर सुनावणी घेतली, तर त्या गुन्ह्यात त्याला दोषी म्हणून सुनावणी घेणार का? असा मुद्दा न्यायालयात उपस्थित करण्यात आला. त्यावर अगोदर इतर जे अर्ज दाखल झाले आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी घेऊ त्यानंतर डिस्चार्ज अॅप्लिकेशन वर सुनावणी घेऊ, असा निर्णय न्यायालयाने घेतला.
आता पुढील सुनावणी 17 जूनला होणार असून वाल्मीक कराडची मालमत्ता जप्ती, पंच हजर करणे यासह अनेक अर्जावर त्या दिवशी सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या या आदेशावर सरकारी वकील व विरोधी पक्षाच्या वकिलांनीही सहमती दर्शवली. तर आरोपीच्या वकीलांन आरोपी कसे निर्दोष आहेत? यावर युक्तिवाद केला. यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. आमचा सरकारी पक्षाच्या युक्तीवादावर विश्वास असून न्याय देवता आम्हाला न्याय देईल, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.