चिपळून फ्लाय ओव्हरला तडा गेल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी ब्रीजचा मोठा आवाज झाला आणि ब्रीज मधोमध तुटला. बहादुरशेख नाका येथे सुरू असलेल्या फ्लाय ओव्हरच्या कामा दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे नागरिक घाबरले आहेत.
ब्रीजला भलामोठा तडा गेल्यामुळे ब्रीज मधोमध कोसळण्याची भीती आहे. गर्डर लाँचरच्या अवजड वजणाच्या ब्रीजच्या मधल्या भागाला तडा गेल्यानं तडा गेलेला भाग तातडीने हटवण्याची गरज आहे. या घटनेचा व्हिडीओऔ समोर आलाय. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, फ्लाय ओव्हरचं काम सुरु असून एका भागाला तडा गेलाय. त्यामुळे कधीही ब्रीजचा तडा गेलेला भाग मधून कोसळू शकतो. नागरिकही चिंतेत आहेत.
advertisement
दरम्यान, वर्धा जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीसदृष्य पावसामुळे ग्रामीण भागातील 39 पुल, रस्ते वाहून गेले आहे. अजूनही पुलं दुरुस्तीचे काम हाती घेतल्या गेले नसल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा सर्वाधिक त्रास हा शेतकरी वर्गाला होतांना दिसतेय. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.