आधी बदलापूर अंबरनाथ, त्यानंतर पुणे आणि आता दापोलीत पिसळलेल्या कुत्र्याने लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपासून या पिसाळलेल्या कुत्र्याने कोळथरे पंचनदी परिसरात दहशत निर्माण केली आहे. या हल्ल्यातून लहान मुले, महिला आणि वयोवृद्धही सुटलेले नाहीत. कुत्र्याने अचानक केलेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांची मोठी पळापळ झाली.
advertisement
या घटनेत गंभीर जखमी झालेल्यांना तातडीने दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एकाच वेळी अनेक जण जखमी झाल्यामुळे पंचक्रोशीत भीतीचे सावट पसरले आहे. प्रशासनाने या पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
