छत्रपती संभाजीनगर शहरातील दर्शनने नुकत्याच स्वीडन येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत जगभरातील 3 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात 3.8 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर रनिंग या तिन्ही क्रिया 16 तासांच्या आत पूर्ण करणे आवश्यक होतं. 21 वर्षांच्या दर्शन घोरपडेने हे आव्हान 15 तास 1 मिनिट आणि 15 सेकंदांत यशस्वीपणे पूर्ण केलं.
advertisement
दर्शनने 19 डिग्री तापमानामध्ये कडाक्याच्या थंडीत 3.8 किलोमीटर स्विमिंग 1 तास 43 मिनिटे 5 सेकंदांत पूर्ण केलं. त्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग 7 तास आणि 25 सेकंदांत पूर्ण केली. विशेष म्हणजे सायकलिंग करताना 6 किलोमीटर रस्ता हा तीव्र चढण असलेला होता. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात त्याने 42 किलोमीटर रनिंगचे 5 तास 51 मिनिटांत पूर्ण केली.
दर्शन म्हणाला, "या स्पर्धेमध्ये मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, वातावरणात खूप बदल होता. वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागला. पण, मी सगळं व्यवस्थित हँडल केलं. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये माझे वडील देखील माझ्यासोबत होते. त्यांनी देखील स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, त्यामुळे मला जास्त आत्मविश्वास होता. मला या स्पर्धेमध्ये माझ्या वडिलांनी खूप मदत केली आहे. त्यामुळेच मी ही स्पर्धा पूर्ण करू शकलो."